Friday, May 3, 2024
Homeजिल्हाPune : अनंतराव पवार महाविद्यालयात पालक आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

Pune : अनंतराव पवार महाविद्यालयात पालक आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन

Pune / दिपाली पवळे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील पालक मेळावा आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये असणारे विविध कोर्सेस, महाविद्यालयाची शैक्षणिक आणि भौतिकदृष्टीने होत असलेली प्रगती, महाविद्यालयामध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा, वैयक्तिक, सांघिक, प्रकारांमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळप्रकारांची माहिती त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये सुरू असणारे असणारे विविध संशोधन प्रकल्प यांची माहिती विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही मिळावी या उद्देशाने पालक आणि माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे होते. Pune News

पालक व माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थितांना नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती देताना प्रा.भरत कानगुडे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा आराखडा, या शैक्षणिक धोरणामध्ये केलेले बदल, नवीन शैक्षणिक धोरणाचे असणारे आंतरविद्याशाखीय स्वरूप याचा उलगडा करताना भारतीय ज्ञान परंपरा, मानवी मूल्य, कौशल्यशिक्षण, संशोधन आणि उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविणे या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर ‘मतदार जाणीव जागृती’ याबाबत डॉ. श्रीकांत देशमुख यांनी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि मतदान करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी माजी विद्यार्थी दीपक आवळे यांनी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने महाविद्यालय करत असलेले काम सांगताना त्यांनी मतदानाचा दिवस हा केवळ सुट्टी म्हणून न घालवता मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी घालवावा आणि इतरांनाही त्याबाबत जागरुक करण्यासाठी घालवावा असा आशावाद व्यक्त केला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. अभय खंडागळे यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचा प्रवास अधोरेखित केला. त्याचबरोबर महाविद्यालय हे शिक्षण देण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षण घेण्याचे ठिकाण असते म्हणून मुळशी तालुक्यामध्ये असलेल्या या महाविद्यालयात ‘मुळशी शैक्षणिक पॅटर्न’ तयार करण्यासाठी विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच पालकांनीही साथ देण्याचे आवाहन या प्रसंगी केले.

यावेळी त्यांनी महाविद्यालयामध्ये सुरू असलेले विविध कोर्सेस, संशोधन प्रकल्प त्याच बरोबर महाविद्यालय पुढील दृष्टिकोनातून कोणकोणते उपक्रम घेणार आहे हे नमूद केले. त्याचबरोबर होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून आपण आपला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.हेमंत उबाळे, डॉ. प्रकाश पांगारे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमांसाठी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. गणेश चौधरी केले. छायांकन वृत्तपत्र विभागातील विद्यार्थी अमोल खंडागळे, अमोल पिटले, प्रियांका इटकर यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय