Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरJunnar : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, 3 जणांवर गुन्हा दाखल

Junnar : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, 3 जणांवर गुन्हा दाखल

Junnar (रफिक शेख) : केवाडी (ता. जुन्नर) येथे सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. यमुना संतोष लांडे, वय-27 वर्षे रा.केवाडी ता. जुन्नर जि.पुणे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. Junnar News

मृत यमुनाचे चुलत भाऊ, समीर शिवाजी सांगडे (रा.हडसर ता. जुन्नर जि. पुणे) यांनी सासरच्या व्यक्तींविरोधात जुन्नर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मृतचे पती संतोष बबन लांडे, सासरे बबन हरिभाऊ लांडे, सासु चांगुना बबन लांडे (सर्व रा. केवाडी ता. जुन्नर जि. पुणे) यांच्या विरोधात भा.द.वि. कलम – 306, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मृत ला मुलबाळ होत नसल्याचे कारणावरुन तिचे पती संतोष बबन लांडे, सासरे बबन हरिभाऊ लांडे, सासु चांगुना बबन लांडे सर्व रा. केवाडी ता. जुन्नर जि. पुणे यांनी यमुना संतोष लांडे हिचा शारिरीक व मानसीक त्रास देवून, तिचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने माणिकडोह धरणामध्ये वेताळबुवा मंदिरा जवळ पाण्यात उडी मारुन जीव दिला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणाचा पुढील तपास जुन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. सई घाटगे करत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय