Friday, May 3, 2024
Homeग्रामीणपुणे : केवाडी येथे सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत काळू गागरे यांची...

पुणे : केवाडी येथे सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत काळू गागरे यांची तक्रार…

जुन्नर (पुुणे) : जुन्नर तालुक्यातील केवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु आहे मात्र या बांधकामाचा प्रस्ताव जुन्नर पंचायत समिती कार्यालय येथे असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नसल्याचे असे चौकशीतुन समोर आले आहे. त्या संदर्भात बांधकाम विभाग जुन्नर येथे चौकशी केली असता ग्रामपंचायत १० गुंठे जागेचा उतारा काही दिवसापूर्वी दिलेला आहे. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे प्रस्ताव किंवा कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी दिली आहे.

तसेच यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामासाठी निमगिरी या ठिकाणी मंजुरी आलेली होती. त्या गावात या बांधकामासाठी दोन एकर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी पुणे येथे पाठविण्यात आलेला होता. परंतु सदर ठिकाणी बांधकामास मंजुर न देता पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून केवाडी या ठिकाणी १० गुंठे जागेचा उतारा सादर करुन त्या ठिकाणी काम मंजूर केले असल्याचा आरोप गागरे यांनी केला आहे. परंतु प्रत्यक्ष जागेची मोजणी केली असता ही जागा १० गुंठे न भरता ती ६ ते ७ गुंठेच भरेल. मात्र सदर जागा कागदोपत्री १० गुंठे दाखवून काम मंजुर करण्यात आल्याचा आरोपही गागरे यांनी एका पत्राद्वारे केला आहे.

शासन निर्णयानुसार या कामाच्या मंजुरीसाठी २ एकर जागा आवश्यक असताना सदर काम हे १० गुंठेजागेसाठी कसे मंजूर झाले या बाबत चौकशी करण्याची मागणी देखील गागरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, ज्या ठिकाणी बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी १० ते २० फुट खोल धारावरती खोदकाम करुन उतरावर भर टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे काही कालावधीनंतर भर टाकलेल्या ठिकाणच्या जागेचे खच्चीकरण होवून त्या ठिकाणी भविष्यात इमारतीस धोका होऊन जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या संदर्भात पंचायत समितीच्या मासिक सभेत हे काम बंद ठेवण्याचा निर्णय झाला असताना देखील हे काम सुरुच असल्याचेही गागरे यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय