Monday, May 6, 2024
Homeजिल्हापुणे : दिव्यांग लोकांना स्पार्क मिंन्डा फाउंडेशन कडून मोफत साहित्य वाटप

पुणे : दिव्यांग लोकांना स्पार्क मिंन्डा फाउंडेशन कडून मोफत साहित्य वाटप

जुन्नर : दिनांक 16 डिसेंबर व 23 डिसेंबर ला जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना व श्रीगोंदा तालुक्यातील लोकांना स्पार्क मिंन्डा फाउंडेशन चिंबळी पुणे व प्रहार रूग्ण सेवक आरोग्य कोठी जुन्नर तालुका व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य यांच्या  संयुक्त विद्यमाने दिव्यांग लोकांना दिनांक 1 डिसेंबर 21रोजी जुन्नर श्री कालिका माता मंगळ कार्यालय जुन्नर येथे व श्रीगोंदा पारगाव शिद्री येथे मोफत साहित्य वाटप वाटप पुर्व नाव नोदणी व तपासणी केली होती.

यावेळी नाव नोदणी केलेल्या दिव्यांग लोकांना  व्हील चेअर, कॅलिपर, कुबडया, काठी, वाॅकर, कृत्रिम अवयवांचे साहित्य 265 लोकांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना कार्यक्रम स्थळी जाण्या – येण्यासाठी स्पार्क मिंन्डा फाउंडेशन चिंबळी पुणे यांच्या कडून  जुन्नर येथून सोय करण्यात आली.  

कार्यक्रम ठीकाणी  लाभार्थी लोकांना  चहा, नाष्टा ,जेवणाची सोय केली होती  व सर्व लोकांना  मोफत साहित्य  मिळाल्याचे दिव्यांग लोकांन च्या चेहर्यावर आनंद दिसून येत  होता  

यावेळी स्पार्क मिंन्डा फाउंडेशन चे डाॅ. सुमेध लव्हाळे, डाॅ. नितिका गुल्हाने, डाॅ. योगिता  मडकाईकर, डाॅ. निलेश पवळे व स्पार्क मिंन्डा फाउंडेशनचे सर्व अधिकारी व जुन्नर तालुक्याचे दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करून मोफत साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक आरोग्य कोठी जुन्नर तालुका व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र राज्य ग्रूप चे अध्यक्ष अरूण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, कार्याध्यक्ष दत्तात्रय हिवरेकर, सुनिल जंगम, सौरभ मातेले, मंगेश भुजबळ, स्वप्निल लांडे, ज्ञानदेव बांगर, उल्हास कासार, अजिज पठाण, अनंत हाडवले, नवनाथ जाधव यांचे सहकार्य लाभले. 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय