Tuesday, March 18, 2025

जुन्नर : ग्राहक संरक्षण कायदा हा भारताच्या सामाजिक न्यायाचा कायदा – बाळासाहेब औटी

जुन्नर / आनंद कांबळे : ग्राहक संरक्षण कायदा हा भारताच्या सामाजिक न्यायाचा असामान्य कायदा आहे हा कायदा भारतच्या प्रज्यातंत्राचे आणि लोकशाहीचे एक अभूद पूर्व उदाहरण आहे हा कायदा कोणत्याही राजकीय पक्षाच्या घोषणेतून किंवा मागणीतून पुढे आला नाही तर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या  प्रयत्नांना मिळालेले यश आहे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी जुन्नर येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त व्यक्त केले.

अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय, जुन्नर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर, यांच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक जागरण सप्ताह शुभारंभ जिजामाता सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी जिजामाता सभागृह ग्राहक जागरण कार्यशाळा निमित्त औटी बोलत होते.

राष्ट्रीय ग्राहक दिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी तहसीलदार रविंद्र सबनीस हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्राहक पंचायत जिल्हा उपअध्यक्ष अशोक भोर, तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, बालविकास प्रकल्प अधिकारी निर्मला कुचिक, रेशनिक दुकानदार संघटना अध्यक्ष मोहन दुबे, पोलिस निरीक्षक विकास जाधव, महिला संघटक कौसल्या फापाळे, जिल्हा संघटक वैशाली अडसरे, देवराम तटू आदीसह मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब औटी पुढे म्हणाले की ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये अमुलाग्रह बदल नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये करण्यात आला आहे नवीन कायद्यात उत्पादन, उत्पादक व त्यांचे कायदेशीर दायित्व व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ग्राहकांचे अधिकार अनुचित व्यापारी प्रथा आणि खोट्या व भ्रामक जाहिराती या तीन महत्वपूर्ण गोष्टींमुळे ग्राहकाला धोका निर्माण झाला आहे, म्हणून केंद्रीय प्राधिकरण स्थापन करण्यात आलेले आहे. याचा प्रभावी वापर ग्राहकांनी व सतर्क राहून उपयोग करून घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

तहसीलदार रविंद्र सबनीस म्हणाले की ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी जागृत राहावे. ग्राहक हा खरे राजा आहे. ग्राहक संरक्षण कायद्याची जपवणूक केली पाहिजे. ग्राहक जागृतीचे कार्य अनेक ग्राहक हितूपदेशी संस्था करत आहे. ग्राहक चळवळ मजबूत करण्यासाठी ग्राहकाने पुढे आले पाहिजे, असे मत सबनीस याने व्यक्त केले.

या वेळी गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, किशोर कुमार खोकले, निर्मला कुचीक आदी ने मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक मोहन दुबे यांनी सूत्रसंचालन वैशाली ताई अडसरे, पुरवठा निरीक्षक गोपाळ ठाकरे यांनी आभार मानले.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles