Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक 11 मधील त्रिस्तरीय पर्यटन केंद्राचे नामकरण भारतरत्न...

पिंपरी चिंचवड : प्रभाग क्रमांक 11 मधील त्रिस्तरीय पर्यटन केंद्राचे नामकरण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान

पिंपरी चिंचवड : आज दिनांक 25 डिसेंबर रोजी परम आदरणीय श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ पवार यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 11 मधील पूर्णानगर येथे विकसित होत असलेल्या जागतिक दर्जाच्या त्रिस्तरीय पर्यटन केंद्राचा नामकरण सोहळा आज महापौर माई ढोरे व भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे, उमेश कुटे, अविनाश मोकाशी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

अटलजींच्या जयंतीनिमित्त या त्रिस्तरीय उद्यानाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान असे नामकरण एकनाथ पवार यांच्या माध्यमातून आज देण्यात आले. तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक संघ यांचा सन्मान सोहळा व महिला बचत गटांचा सन्मान सोहळा यावेळी पार पडला.

यावेळी निगडी चिखली मंडल अध्यक्ष महादेव कवितके भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष अजय पाताडे, पोपट हजारे, प्रभाग अध्यक्ष संतोष ठाकुर, गोरख पाटील, हरजीत सिंग बारडा, श्रीकांत दादा कदम, आनंदा यादव, सूर्यकांत शेंडे, सुभाष सावंत, संदीप मंगवडे, अनिकेत बाबर, उद्धव शेळके, शशिकांत जगताप, अनिल माने, भिमाजी पानमंद, सुदीप नायर, किरण यादव विजय नंदनवार, तात्या भोसले, अश्विनी शिंदे, कविता हिंगे, सुनिता जगताप, योगिता केदारी, अक्षता पताडे, दीपाली धानोकर, वैशाली खामकर, माधुरी भटकर, यांच्या सह प्रभाग क्रमांक 11 मधील असंख्य नागरिक व भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी या नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित होते.

तसेच या नामकरण सोहळ्याचे सूत्रसंचालन भारतीय जनता पार्टी पूर्णानगर विभाग अध्यक्ष श्रीकांत कदम यांनी केले, तसेच प्रभाग अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी आभार मानले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय