Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणपुणे : माहिती देण्यास टाळटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांच्याच पाठीशी गटविकास अधिकारी ? प्रथम...

पुणे : माहिती देण्यास टाळटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांच्याच पाठीशी गटविकास अधिकारी ? प्रथम सुनावणीला ही मिळेना मुहूर्त

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुणे : भारतीय पोस्टाचे एकाच दरपत्रक देशात लागू असताना रजिस्टर पोस्टाचे दर रुपये वीस (पाच ग्रॅम) पर्यंत असताना माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीसाठी रुपये ९५ ची मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीतील ग्रामसेवक राजेवाडी, तळेघर, गोहे खुर्द यांनी केली असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते डॉ. कुंडलिक केदारी यांनी सांगितले.

तसेच डॉ. केदारी म्हणाले,  सद्या बरेच ग्रामसेवक ग्रामपंचायतीतील विविध कामांची माहिती देण्यास उसुक नसतात. तांत्रिक मुद्दे उपस्थित करून तळाटाळ करणे, वेळकाढूपणा करणे हे नेहमीचे झाले असले, तरी रजिस्टर पोस्ट २० रू ऐवजी ९५ रू मागणी संतापजनक आहे.

हेही वाचा ! पुणे : आदिवासी भागातील सचिन लांडे याची UPSC परिक्षेत गगनभरारी !

ग्रामपंचायत गोहे खुर्द रजिस्टर खच रू ९५+१२ = १०७ तर राजेवाडी ९५+१२ = १०७ आणि तळेघर ९५+६ = १०१ अशी मागणी  होती.

याबाबत प्रथम तक्रार गटविकास अधिकारी आंबेगाव यांचेकडे केली असता, त्यांनी दखल घेतली नाही म्हणून उपकार्यकारी अधिकारी (पंचायत) पुणे जिल्हा परिषद कडे तक्रार नोंदविण्यात आली, त्यानंतर वर त्यांनी तिन्ही ग्राम सेवकांची नियमानुसार चौकशी करून तक्रारीचे निवारण करावे. व पोस्टेज च्या नावे  नागरिकांची लूट थांबवावी असे आदेश गट विकास अधिकारी पाचयत समिती आंबेगाव यांना दिले. परंतु आठ महिने उलटून गेले तरी सबंधित ग्रामसेवकांची चौकशी केली नाही, उलट गटविकास अधिकारी त्यांना पाठीशी घालतात, असा आरोप डॉ. केदारी यांनी केला आहे. 

हेही वाचा ! जुन्नर : माणकेश्वर येथे वन धन योजनेची कार्यशाळा संपन्न

डॉ. केदारी म्हणाले, हीच केस माहिती अधिकार अपिलात दखल केली. त्यालाही पाच महिने झाले तरी गटविकास अधिकारी आंबेगाव यांना सुनावणीस मुहूर्त मिळेना, असा आंबेगाव तालुका पंचायत समितीचा भोंगळ कारभार सुरू आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय