Wednesday, August 17, 2022
Homeराजकारणकन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी "या" दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश !

कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी “या” दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

Kanhaiya Kumar and Jignesh Mewani to join Congress on "this" day!

नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) नेते कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी हे २८ सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम २ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आला होता, परंतु तो आता २८ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. 

जिग्नेश मेवानी यांना गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवले जाऊ शकते. त्याचबरोबर कन्हैया कुमारसोबत डाव्यांचे आणखी बरेच नेतेही काँग्रेसमध्ये येऊ शकतात. हा कार्यक्रम आता २८ सप्टेंबर रोजी भगतसिंग यांच्या जयंतीला होणार आहे, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

जिग्नेश मेवाणी हे दलित नेते आहेत, जे गुजरातच्या वडगाम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवले जाऊ शकते.

काही मीडियाच्या वृत्तानुसार कन्हैया कुमारने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांची दोन आठवड्यात दोनदा भेट घेतली आहे आणि पक्षात त्यांच्या भविष्यातील भूमिकेवर चर्चा केली आहे. कुमार यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक बिहारमधील बेगूसराय येथून लढवली होती, परंतु भाजपचे गिरीराज सिंह यांच्याकडून कुमार पराभूत झाले.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय