Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाParbhani : किसान सभेचे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Parbhani : किसान सभेचे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

परभणी : सेलू येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभा (लालबावटा) च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सेलू जिंतूर तालुक्यातील शेकडो शेतकरी शेतमजूर सहभागी झाले होते. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. Protest in front of Kisan Sabha Deputy Collector office Parbhani 

परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, जिल्हाधिकारी परभणी यांनी घोषित केलेला 25 टक्के अग्रीम विमा वाटप करावा, जिंतूर तालुक्यातील वन पट्टे धारकांना वन जमीन नावे करा, मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा, सरकारी नोकरीचे खाजगीकरणाचा शासन निर्णय रद्द करा ई मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

दुष्काळ जाहीर न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आंदोलनात कॉम्रेड उद्धव पौळ, अंकुश बुधवंत, रामेश्वर पौळ, दत्तुसिंग ठाकूर, राजू दक्ष, विष्णू चव्हाण, नारायण पवार, रोहिदास हातकडके, मदन पौळ, गजानन जवादे, शांतीराम पौळ, मारोती कुईले, रामदास पौळ, बापुराव निंबाळकर, रमेश बोडखे, संतोष निंबाळकर, हरी गायकवाड, गजानन बोटे, बबन दुभळकर, लक्ष्मण निंबाळकर सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय