Tuesday, April 30, 2024
Homeआंतरराष्ट्रीयSolar Eclipse : सूर्यग्रहण पाहण्यासाठी कैद्यांची तुरूंगातून सुटका

Solar Eclipse : सूर्यग्रहण पाहण्यासाठी कैद्यांची तुरूंगातून सुटका

Solar Eclipse : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी होणार आहे. दरवेळी होणाऱ्या सुर्यग्रहणा पेक्षा हे सुर्यग्रहण खास असणार आहे. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी जगभरातील लोक याबाबत खूप उत्सुक असून थेट कैद्यांनी देखील सूर्यग्रहण पाहण्याची परवानगी मागितली आहे.

प्रत्येक 18 महिन्यांनी या पृथ्वीतलाच्या कुठल्यातरी भागामध्ये सूर्यग्रहण (Solar Eclipse) होत असते. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत बिंदू म्हणून येतो तेव्हा चंद्राची सावली सूर्यावर पडते व सूर्य झाकवला जातो व त्यालाच आपण ग्रहण म्हणतो. या वर्षीचे सूर्यग्रहण हे 8 एप्रिल रोजी रात्री 09:12 वाजता सुरू होऊन मंगळवार, 9 एप्रिल रोजी पहाटे 02:22 वाजता समाप्त होणार आहे. तेथील कैद्यांनी न्यायालयाकडे मागणी केली आहे की, त्यांना त्यांच्या बॅरेकमधून सूर्यग्रहण पाहण्याची परवानगी द्यावी.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्क शहरातील 6 कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कैद्यांनी ग्रहण पाहण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता. न्यूयॉर्क तुरुंगातील कैद्यांनी 8 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण पाहण्यासाठी तुरुंगात सुविधांची मागणी केली आहे. सूर्यग्रहण पाहण्याची मागणी करत कैद्यांनी न्यायालयात खटलाही दाखल केला होता.

न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर कैद्यांनी सूर्यग्रहण पाहणे हा त्यांचा धार्मिक अधिकार असल्याचे मत मांडले. यात विशेष म्हणजे एकापेक्षा जास्त धर्मातील कैद्यांनी धार्मिक कारणावरून ही विनंती केली आहे.

हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिकेच्या काही भागांमध्ये संपूर्णपणे दिसणार आहे व त्या ठिकाणी चार मिनिट नऊ सेकंद इतका वेळ पूर्ण अंधार असणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय