Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणचाईल्ड फंड इंडिया या सामाजिक संस्थेच्या पुणे शाखेच्यावतीने दिली प्राथमिक वैद्यकीय उपकरणे

चाईल्ड फंड इंडिया या सामाजिक संस्थेच्या पुणे शाखेच्यावतीने दिली प्राथमिक वैद्यकीय उपकरणे

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ओतूर, मढ, शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास चाईल्ड फंड इंडिया प्रॉजेक्ट होप अंतर्गत कोळवाडी, पुणे शाखेकडून स्थानिक आरोग्य पातळीवर प्राथमिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

जे राज्याच्या अतिसंवेदनशील जिल्ह्यातील कोव्हिड केअर सेंटर म्हणून काम करतात अशा घटकांना पीपीई आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणे पुरविणे या उद्देशाने आशा वर्कर्स, स्वयंसेविका, आरोग्य सेविका यांच्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले.

तसेच, चाईल्ड फंड इंडिया या संस्थेच्या वतीने वैद्यकीय उपकरणांमध्ये ऑक्सिजन मास्क ३५०, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ६, नॉन रिब्रेटोर मास्क १००, बायपॅप मशिन ६, पल्स ऑक्सिमिटर १२०, ऑक्सिजन फ्लो रेग्युलेटर ९ ही उपकरणे देण्यात आली.

दरम्यान, जुन्नर तालुक्यातील ४२ आदिवासी गावांमध्ये ०-६, ०७-१४ व १५-२४ या वयोगटातील मुलं व त्यांच्या कुटुंबाबरोबर आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, उपजीविका आधारित उपक्रम गाव पातळीवर या संस्थेने राबविले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय