Friday, April 26, 2024
HomeNewsपरीट सेवा मंडळ पुणे शहर राज्यस्तरीय वधू वर मेळावा संपन्न

परीट सेवा मंडळ पुणे शहर राज्यस्तरीय वधू वर मेळावा संपन्न

पुणे/क्रांतिकुमार कडुलकर:२५ डिसेबर रोजी पुणे येथे परीट समाजातील वधू वर मेळावा प्रचंड प्रतिसादासह पार पडला.अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर सुरेश नाना नाशिककर होते.मेळाव्याचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे अधक्ष शरद नाना पवार ह्यांनी राष्ट्र संत गडगे महाराज ह्यांना पुष्प अर्पून व दीप प्रज्वलन करून झाले.प्रमुख पाहुण्या म्हणून आळंदी च्या उपनगराध्यक्ष श्रीमती मीरा पाचुंदे, पुणे शहरचे अध्यक्ष अनुप राऊत,क्षत्रिय मराठा परिट सेवा मंडळचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, महाराष्ट्र परिट सेवा मंडळचे अध्यक्ष राजेंद्र खैरनार,पुणे महीला अध्यक्ष पुष्पा भोसले उपस्थित होते.

मेळाव्यात पुणे शहातील सामाजिक कार्याबद्दल रत्नाकर दळवी व कुसुमताई जाठवडेकर ह्यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.मेळाव्या मध्ये विविध क्षेत्रातील उल्लखनीय कार्याबद्दल महिलांचा सत्कार करण्यात आला.. ६० मिनिटा मध्ये ६१ नववधूचे मेकअप करून इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रकॉर्ड मध्ये नाव अधोरेखित केलेल्या इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट वृषाली सचिन शेडगे ह्यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच वर्षाताई दळवी (पोलीस पाटील), सुप्रिया अजित टापरे (डॉक्टर),ललिता कुमार गवळी (परिचारिका),सारिका कदम (अंगणवाडी सेविका),तृप्ती ठाणेकर (कोंसलार, रुबी हॉल),मेघा वाघमारे (परिचारिका),रेश्मा नांगरे (परिचारिका),अर्चना पारवे (प्राध्यापिका),अनिता भोसले ( डॉक्टर)प्रज्ञा राऊत (डॉक्टर),आशा अभंग (स्वयंसेविका),मनीषा शिंदे (राष्ट्रसेवा समिती ) ह्या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. सचिन शेडगे ह्यांनी सर्व सत्कारमूर्तीं महिलांचा विशेष परिचय करून दिला.या मेळाव्याला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा,गुजरात,मध्यप्रदेश अश्या विविध राज्यातून समाजबांधांव उपस्थित होते.४५० पेक्षा जस्त वधू व वर ह्यांनी नोंदणी केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन राऊत यांनी केले. आभार प्रदर्शन सचिन शेडगे ह्यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय