Tuesday, May 7, 2024
HomeNewsPMPL-पुणेकरांसाठी आता डबलडेकर बस सेवा सुरू होणार

PMPL-पुणेकरांसाठी आता डबलडेकर बस सेवा सुरू होणार

पुणे/क्रांतिकुमार कडुलकर:पुणेकरांना लवकरच डबलडेकर बसने प्रवास करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) मुख्य कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत, पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) ओम प्रकाश बकोरिया यांनी शहरात डबल डेकर बस सेवा सुरू करण्याची व्यवहार्यता तपासण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

पीएमपीएमएलने शेअर केलेल्या माहितीनुसार, सोमवारी पीएमपीएमएलच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बकोरिया यांनी डबल डेकर बसच्या कामकाजाबाबत मुंबई बेस्टच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध मार्गांवर डबलडेकर बस सेवा सुरू करण्याच्या व्यवहार्यतेचा आढावा घेण्यासही बकोरिया यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

बकोरिया म्हणाले, “पुण्यामध्ये डबल डेकर बस सेवा सुरू करता येतील का, यासंदर्भातील व्यवहार्यता अहवाल मी आमच्या वाहतूक विभागाला दिला आहे. त्यानुसार ते सेवा सुरू करण्यासाठी विविध मार्गांचा अभ्यास करणार आहेत. अहवाल सकारात्मक आल्यास पुणेकरांसाठी डबल डेकर बससेवा सुरू करण्याबाबत आम्ही नक्कीच विचार करू.”

सध्याच्या बसेस गर्दीच्या वेळी खचाखच भरतात आणि त्यामुळे उशीर होत असल्याने डबलडेकर बससेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी होती. डबल डेकर बसेसमध्ये प्रति बस जास्त प्रवासी बसतील. ९० च्या दशकाच्या सुरुवातीस, तत्कालीन पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (PMT) ने पुण्यात डबल-डेकर बस सेवा सुरू केली होती जी मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर आणि निगडी दरम्यान धावत होती कारण बहुतेक कंपन्या त्या मार्गावर होत्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय