Friday, May 3, 2024
Homeआंबेगावजिल्हा कृषी अधीक्षक यांच्या समवेत किसान सभेच्या शिष्टमंडळाची सकारात्मक बैठक

जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या समवेत किसान सभेच्या शिष्टमंडळाची सकारात्मक बैठक

पुणे : हिरड्याची नुकसान भरपाई मिळावी याविषयक, राज्यशासनाला हिरडा नुकसान भरपाई विषयक सुधारित प्रस्ताव तत्काळ पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे योग्य त्या माहितीसह अहवाल त्वरित सादर केला जाईल, असे जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत आश्वासन दिले.

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.अजित अभ्यंकर, किसान सभेचे उपाध्यक्ष ऍड.नाथा शिंगाडे व जिल्हा अध्यक्ष डॉ.अमोल वाघमारे इ.उपस्थित होते.

जून 2020 मध्ये, निसर्ग चक्रीवादळात हिरड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे झाले होते, परंतु याबाबत नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. हिरडा नुकसान भरपाई मिळावी यासाठी, किसान सभेच्या वतीने जून 2020 पासून आजतागायत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

किसान सभेच्या वतीने, नाशिक ते मुंबई व अकोले ते संगमनेर असे दोन लॉंग मार्च या वर्षांमध्ये निघाले होते.या दोन्ही लॉन्ग मार्चमध्ये मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी हिरड्याची नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप हिरड्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. हिरड्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी हजारो शेतकऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केलेले आहेत.

राज्य शासनाने दिलेले लेखी आश्वासन पाळावे यासाठी किसान सभेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.यासर्व पार्श्वभूमीवर राज्यशासनाला पुन्हा एकदा, सुधारित हिरडा नुकसान भरपाई विषयी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या अहवालावरून, जिल्हाधिकारी कार्यालय,राज्य शासनास सादर करणार आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या समवेत झालेल्या चर्चेत हिरडा नुकानभरपाई विषयक सादर करण्यात येणाऱ्या अहवालात कोणकोणते मुद्दे असावे याविषयी किसान सभेच्या वतीने सविस्तर मुद्दे मांडण्यात आले.यावर कृषी अधीक्षक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे किसान सभेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Lic
Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय