Friday, May 17, 2024
Homeग्रामीणपिंगला पावरा यांची 'महाराष्ट्र राज्य महिला संघटक' पदी निवड

पिंगला पावरा यांची ‘महाराष्ट्र राज्य महिला संघटक’ पदी निवड

रत्नागिरी : दापोलीत शिक्षिका असलेल्या सौ.पिंगला सुशिलकुमार पावरा यांची ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला संघटक पदी निवड करण्यात आली आहे. पिंगला पावरा ह्या संघटनेच्या जिल्हा सचिव म्हणून कार्यरत होत्या. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाडवी व जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य यांनी पिंगला पावरा यांची राज्य कार्यकारिणी साठी शिफारस केली होती. 

त्यानुसार मीट द्वारे ऑनलाईन सभेत झालेल्या दिनांक 7 मार्च 2021 रोजीच्या राज्यस्तरीय सभेत ही निवड ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मधूकर उईके यांनी केली. विजय कोकोडे केंंद्रीय सरचिटणीस यांनी पिंगला पावरा यांची राज्य महिला संघटक पदी निवड झाल्याचे सभेत घोषीत केले. 

आदिवासींचे हक्क व अधिकार, पदोन्नती व तसेच आदिवासी अधिकारी व कर्मचारी यांच्या एकूणच सर्व आदिवासी समाजाच्या विषयांवर काम करणारी ही संघटना असून न्यायिक लढा लढत असते. पिंगला पावरा यांची राज्य महिला संघटक पदी निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशनच्या केंद्रीय, राज्य व जिल्हा व तालुका स्तरीय सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सर्वच आदिवासी बांधवांनी अभिनंदन केले आहे. 

राज्यातील आदिवासी कर्मचारी व अधिकारी यांना या संघटनेद्वारे संघटित करण्याचे काम आपण करणार असल्याचे, यावेळी नवनिर्वाचित राज्य महिला संघटक  पिंगला पावरा यांनी सांगितले. 

पिंगला पावरा या बिरसा क्रांती दल अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्या पत्नी आहेत. ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन ही बिरसा क्रांती दलाची सहयोगी संघटनांपैकी एक आहे. म्हणून पिंगला पावरा यांच्या या निवडीबद्दल बिरसा क्रांती दल पदाधिकाऱ्यांंनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय