Sunday, May 5, 2024
Homeग्रामीणजुन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'कुकडेश्वर' यात्रा रद्द

जुन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘कुकडेश्वर’ यात्रा रद्द

शिरोली (जुन्नर) : कोरोनाचे संकट गडद होत असताना धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना मर्यादा आल्या आहेत. यात्रा, जत्रा आणि जयंती. उत्सव सुध्दा रद्द केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिरोली (ता.जुन्नर) येथील शिवरात्रीला भरणारी कुकडेश्वर येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे.

गुरुवार (ता.११) मार्च रोजी श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिर येथे होणारी महाशिवरात्री यात्रा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायती कडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दुकानदारांनी कोणत्याही प्रकारची दुकाने लावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील कोरोनाचे संकट गडद होताना असताधा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींंकडून खबरदारी घेतली जात आहे. तसेच नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवहान केले जात आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय