पिंपरी चिंचवड : दुय्यम निबंधकाचे काम सरकारला महसूल गोळा करुन देण्याचे आहे. जागेच्या मालकीबाबत खात्री करण्यास त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत. मात्र, दुय्यम निबंधक मिळकतींचे मालकी हक्क तपासत दस्त नोंदण्याचे नाकारत आहेत. पंरतु, पैसे देऊन हे दस्त नोंदवले जात आहेत. (pcmc)
यामध्ये करोडो रुपयांची नागरिकांची फसवणुक केली जात असल्याबाबतचे निवेदन ॲड. एस.के.गोयल, अॅड. बाळासाहेब थोपटे, ॲड. रघुवीर गायकवाड यांनी सह जिल्हा निबंधक मा. माईनकर साहेब यांना दिले आहे. (pcmc)
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाल देऊन आयजीआर महाराष्ट्र यांनी १२ जुलै २०२१ रोजी काढलेले परिपत्रक बेकायेशीर घोषित केले. तसेच कोणत्याही प्रकारचे दस्त नाकारायचे नाहीत, प्रत्येक दस्त स्वीकारुन रेडी रेकनरप्रमाणे योग्य स्टॅप स्वीकारुन व त्या दस्ताची नोंदणीबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन तो दस्त संबंधित पक्षकाराला देण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.
या आदेशाविरोधात आयजीआर सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. यावर कोणत्याही प्रकारचा स्टे नाही. मात्र, दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वोच न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. असे सांगून दस्त नोंदणी नाकारले जात आहे. मात्र, पैसे दिल्यास असे दस्त नोंदवले जात आहेत. (pcmc)
मात्र, असे दस्त नोंदवायचे असल्यास दुय्यम निबंधक कैल्कुलेटरवर आकडे दाखवून नागरिकांकडून गुपचूप पैसे घेतात. दुय्यम निबंधकांना जागेची मालकी तपासण्याचा अधिकार नाही, याबाबत मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय आहेत. त्यात म्हटले आहे की, दस्त नोंदवणे हे दुय्यम निबंधकाचे कर्तव्य असून दस्त नाकारतात व पोच पावती देत नाहीत, हा गुन्हा आहे. दुय्यम निबंधकाला जमिनीच्या मालकी हक्काबाबत चौकशी करण्याचा अधिकार नाही. याबाबत योग्य ती कारवाई दुय्यम निबंधक अधिकाऱ्यावर होणे अपेक्षित आहे. नागरिकांची झालेली लूट शासनाने वसूल करून नागरीकांना परत करावी. तसेच, कायदेशीर कारवाई भ्रष्ट नोंदणी अधिकाऱ्यांवर शासनाकडून करण्यात यावी. (pcmc)
दुय्यम निबंधक जनतेची फार मोठी फसवणूक करत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्याला पाठिंबा असल्याचे समजत आहे. त्यामुळे काही वकिलांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सह दुय्यम निबंधक काही वकिलांचे कायदेशीर जास्त नाकारत आहेत. त्यावर त्वरित कारवाई करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा.
हेही वाचा :
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !
मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले
वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी