Tuesday, September 17, 2024
Homeताज्या बातम्याShah Rukh Khan : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा...

Shah Rukh Khan : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान तातडीने अमेरिकेला रवाना होणार आहे. मुंबईत उपचारादरम्यान काही अडचणी आल्यामुळे शाहरुख खानने (Shah Rukh Khan) पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरुख मंगळवारी अमेरिकेला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला मोतीबिंदूचा त्रास सुरु असून, मागील महिनाभरापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. 29 जुलै रोजी त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, पण ती यशस्वी झाली नाही. त्यामुळे पुढील उपचारासाठी शाहरुख खान अमेरिका गाठणार आहे. अमेरिकेत मोतीबिंदूवरची पुढील शस्त्रक्रिया होणार आहे आणि त्यानंतर तो स्वित्झर्लंडला जाणार असल्याचे वृत्त आहे.

आयपीएलच्या दरम्यान शाहरुखला उष्माघाताचा त्रास झाला होता, त्यानंतर त्याला काही काळ रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्याला मोतीबिंदू असल्याचे असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील उपचारांनंतरही समस्या कायम राहिल्याने शाहरुखने अमेरिका गाठण्याचा निर्णय घेतला आहे.

Shah Rukh Khan चे आगामी प्रोजेक्ट्स

शाहरुख खानने मे महिन्यात सांगितले होते की, 2024 मध्ये आपण चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहे. शाहरुख खान लवकरच आपली लाडकी लेक सुहाना सोबत ‘किंग’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि सुहाना शाहरुखसोबत ॲक्शन सीन करताना दिसणार आहे.

शाहरुखचा मागील चित्रपट ‘डंकी’ हा 2023 च्या नाताळच्या दिवशी रिलीज झाला होता. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होती.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

संबंधित लेख

लोकप्रिय