पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : निगडी येथील संतोष घोणे यांना दि थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस फ्रांस या विद्यापीठाने पीएचडी पदवी बहाल केली. pcmc news
घोणे यांनी बिझनेस मॅनेजमेंट रेफरन्स ह्युमन रिसोर्स ॲंड फॅसिलिटी सर्व्हिसेस या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली. थेम्स विद्यापीठातून संतोष घोणे हे या विषयामध्ये पदवी मिळविणारे भारतातील उद्योजक आहेत. यासाठी प्रा. राकेश मित्तल यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
थायलंड येथे झालेल्या आशिया- पॅसिफिक शैक्षणिक परिषदेत, आदीपू विद्यापीठाचे प्रमुख डॉ. जिदप्पा थेवारिन, थेम्स विद्यापीठाचे ॲकॅडमीक संचालक डॉ. इर्विन डेलीन टोरस यांच्या हस्ते हि पदवी बहाल करण्यात आली.
संतोष घोणे यांना आशिया पॅसिफिक एज्युकेशन समीट मध्ये आशिया आयकॉनिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संतोष घोणे यांनी बिझनेस मॅनेजमेंट रेफरन्स ह्युमन रिसोर्सेस या क्षेत्रामध्ये ३२ वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी आजतागायत ३०० कंपन्यांना सुमारे ६ हजार कुशल कामगार पुरवठा केला आहे. तसेच ते औद्योगिक कामगार सेवा, सुरक्षा सेवा, कामगार संपर्क आणि प्लेसमेंट सेवा पुरवठा करत आहेत. pcmc news
यावेळी घोणे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात कंपनी मालक आणि कामगार यांच्यात समन्वय असायला पाहिजे. कुशल कामगारांना नोकरीची संधी मिळत नाही. ज्या कामगारांना नोकरीची संधी मिळते त्यांना कंपनीकडून खूपच अपेक्षा आहेत. यामुळे कामगार आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यात मोठी दरी निर्माण झालेली आहे.
कामगारांसाठी असलेली तळमळ, उत्तम समन्वय साधण्याची वृत्ती, कामाचा प्रदीर्घ अनुभव, माणसे जोडण्याची कला आणि समाजाप्रतीची बांधिलकी या श्री घोणे यांच्या गुणांचा या यशामध्ये मोठा वाटा आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट
ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन
धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना
ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस
मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात
निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश
मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात
लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा
मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू
मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल