Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आनंद शिंदे यांच्या लोकगीतांना सांगवीकरांचा उदंड प्रतिसाद

PCMC : आनंद शिंदे यांच्या लोकगीतांना सांगवीकरांचा उदंड प्रतिसाद

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : विशिष्ट शैलीतील ठसकेबाज गायकीसाठी प्रसिध्द असलेले ज्येष्ठ गायक आनंद शिंदे (Ananad shinde) यांच्या लोकगीतांना सांगवीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. PCMC

सांगवीतील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. pcmc news

त्याअंर्तगत शनिवारी रात्री जुन्या सांगवीतील एकता चौकात आनंद शिंदे यांच्या लोकगीतांचा “जलसा” या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. pcmc news

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष कांबळे, गणेश बँकेचे संचालक संजय जगताप, ऑल इंडिया बॉडी बिल्डींग असोसिएशनचे खजिनदार राजेश सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बाराथे, सचिव बाळासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप तनपुरे आदी उपस्थित होते. pcmc news

यावेळी परिसरातील नागरिकांची तुडुंब गर्दी झाली होती. शंकर जगताप यांच्या हस्ते आनंद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. शाहीरीच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याच्या संस्थेच्या उपक्रमाचे जगताप यांनी कौतुक केले.

आनंद शिंदे यांनी या कार्यक्रमात भीमगीते, बुद्धगीतांपासून त्यांची प्रसिध्द असलेली अनेक बहारदार गाणी गायली. प्रेक्षकांकडून त्यांना भरभरून दाद मिळाली.

सांगवीकरांच्या रसिकतेचे शिंदे यांनी आवर्जून कौतुक केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव योगेश कांबळे यांनी तर रवींद्र यादव यांनी आभार मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय