Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जर तीन दिवसांनी शहराला पाणीपुरवठा झाला तर....

PCMC : जर तीन दिवसांनी शहराला पाणीपुरवठा झाला तर….

भविष्याचा वेध घेणारे पथनाट्य! PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपळे गुरव या परिसरात सामाजिक काम करणाऱ्या दिलासा संस्था, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, मानवी हक्क संरक्षण जागृती, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने कडक उन्हाळ्यात पाणी बचतीचा संदेश देणारे पथनाट्य राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे सादर करण्यात आले.

वासुदेव आला हो, वासुदेव आला.
पाणी बचत सारे, मिळून करू या चला..

असा संदेश देत वासुदेवाच्या भूमिकेत अण्णा जोगदंड यांनी पथनाट्याची सुरुवात केली.

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते ईश्वर आहेत, असे वासुदेव सांगत होता. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाणी साठे मर्यादित आहेत, पाण्याचे महत्व समजून पाणी वापरावे, अन्यथा येत्या काही वर्षात शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल आणि मग भविष्यात तीन दिवसांनी पाणीपुरवठा शहरातील नागरिकांना स्वीकारावा लागेल.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वड, पिंपळ प्राचीन वृक्षांची लागवड केली पाहिजे. आणि ती जगवली पाहिजेत, असा माहितीपूर्ण संदेश देणारे पथनाट्य सादर करून पाण्याबरोबरच वृक्षलागवडीचे महत्त्व पथनाटयातुन सांगण्यात आले.

या पथनाट्या (street play) मध्ये मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, दिलासा संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, गुणवंत कामगार संगीता जोगदंड, शब्दधन काव्यमंचाचे सदस्य नंदकुमार कांबळे, शामराव सरकाळे तसेच दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सहभाग घेतला. pcmc news

पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, त्यास वाचवण्याचा करा, जर तीन दिवसांनी पाणी आले तर ? प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा. असा संदेश दिला जात होता. pcmc news

पटनाटय कार्यक्रमाला ह. भ. प. बंडोपंत शेळके, अनिल जाधव, वसुंधरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तानाजी एकोंडे, शिवाजीराव शिर्के, संजय चव्हाण, निलेश हंचाटे, भरत शिंदे, शंकर नानेकर, विनोद सुर्वे, गणेश वाडेकर,लक्ष्मण शिंदे, इश्वरलाल चौधरी, फुलवती जगताप, लक्ष्मण जोगदंड, विकास कोरे, आत्माराम हारे, सोमनाथ कोरे, दत्तात्रय धोंगडे, अरुण परदेशी, जाई जोगदंड, बबन मगर, विकास कोरे, काळूराम लांडगे, बळीराम शेवते, भरत शिंदे, प्रकाश वीर, गणेश वाडेकर, रवींद्र तळपादे, गणपत शिर्के, श्रीराम डुकरे, दत्तात्रय डोंगरे, इंद्रजीत चव्हाण,ऋतिक मगर, उपस्थित होते. pcmc news

आण्णा जोगदंड, कैलास भैरट आणि योगिता कोठेकर यांनी पाणी बचतीच्या कविता सादर केल्या.

हेमंत जोशी यांनी आभार मानले. राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय