Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : अग्नि सुरक्षेकडे दुर्लक्ष - चिखली, तळवडे येथे चार मिळकती सिल

PCMC : अग्नि सुरक्षेकडे दुर्लक्ष – चिखली, तळवडे येथे चार मिळकती सिल

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मनपाच्या अग्निशमन विभागाने बजावलेल्या नोटिसा नंतरही कोणतीही आग प्रतिबंधक कार्यवाही न करणाऱ्या आस्थापना, दुकाने, व्यावसायिक मिळकती यावर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. PCMC

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील मिळकतींच्या सुरक्षेसाठी अग्निप्रतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण करण्यात येत आहे. शहरामध्ये औद्योगिक व व्यावसायिक मिळकतींना आग लागल्याने जीवित व वित्तहानीच्या घटना घडत असून अग्निशमन विभागाने घटना घडण्यामागील कारणांचे अवलोकन केले आहे.

त्यानुसार, मनपा क्षेत्रातील बहुतांश व्यवसायिक मिळकतींमध्ये अग्न‍िप्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्यामुळे सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच व्यवसायाच्या ठिकाणीच वास्तव्य, धोकादायक पदार्थांचा साठा ई. केल्याचे दिसून आहे आहे. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये, याकरीता पिंपरी चिंचवड (pcmc) शहरातील आद्योगिक, व्यावसायिक मिळकतींमध्ये अग्निप्रंतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण सुरु आहे.

सदर सर्वेक्षणामध्ये, मनपा क्षेत्रातील व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक, संस्थात्मक व वैद्यकिय इमारतींचे अग्नि प्रतिबंधात्मक सर्वेक्षण झालेल्या मिळकतीपैंकी धोकादायक मिळकतींची ओळख पटवून मिळकतीमध्ये अग्निशमन यंत्रणांची उपलब्धता, ये-जा करण्याचा सुरक्षित मार्ग, धोकादायक पदार्थांचा साठा, मिळकतीमध्ये निवासी वास्तव्य इत्यादी बाबींचा विचार करुन मिळकतधारकांना आत्तापर्यंत दोन वेळा नोटिस बजाविण्यात आल्यानंतर काहींनी त्याबाबत पुर्तता सुध्दा केली.

परंतू, त्यानंतरसुध्दा सदर मिळकतधारकांनी कोणताही प्रतिसाद न देऊन कोणतीही कार्यवाही न केलेल्या मिळकतींवर पाणी व वीज पुरवठा बंद करुन चिखली व तळवडे भागातील चार मिळकती सिलबंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. pcmc news

त्यामुळे यापुढेही ज्या मालमत्ता कोणतीही कार्यवाही करणार नाहीत, अशा मिळकती सिलबंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अग्निसुरक्षा प्रमाणपत्र विभागाकडे सादर करण्याची जबाबदारी इमारतीचा मालक व भोगवटादाराची.

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अधिनियमातील कलम ३(१) प्रमाणे कोणत्याही इमारीतीमध्ये किंवा तिच्या भागामध्ये आवश्यक असणाऱ्या आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे, तसेच कलम ३(३) नुसार, लायसन्स प्राप्त एजन्सीकडील असणाऱ्या नमुन्यातील व्यवसाय अग्निसुरक्षा प्रमाणपत्र मनपा अग्निशामक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या इमारतीचा मालक किेंवा तिचा वापर करणारा भोगवटादार यांची असल्याचे सुध्दा विभागाने स्पष्ट केले आहे. pcmc news

कारवाई यापुढे सुद्धा सुरू राहणार…

पिंपरी-चिंचवड (pcmc) शहरातील औद्योगिक, व्यावसायिक, शाळा, रुग्णालये आदी सार्वजनिक ठिकाणी आगीच्या घटना घडून कोणतीही जीवित व वित्त हानी टाळणे हेच महानगरपालिकेचे ध्येय आहे. त्यासाठीच महानगरपालिका सर्वेक्षणाच्या माध्यमातून काम करीत आहे. परंतू, शहरातील ज्या व्यावसायिक मिळकतधारकांच्या कोणत्याही प्रकारची सुचविलेली कार्यवाही होत नसल्याने मिळकती सीलबंद करण्याची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

व्यवसाय अग्निसुरक्षा पुर्तता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्या.

शहरातील सर्व औद्योगिक, व्यापारी, शाळा, रुग्णालये इत्यादी व्यावसायिकांनी महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस, महाराष्ट्र शासन यांनी नियुक्त केलेले फायर लायसेंसिंग एजन्सीमार्फत त्यांच्या व्यवसायिक इमारतीमध्ये नियमानुसार आवश्यक अग्निशमन यंत्रणा (Fire safety) बसवून घ्यावी. त्याबरोबरच मनपाच्या अग्निशामक विभागकडे अर्ज करुन व्यवसाय अग्निसुरक्षा पुर्तता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. असेही विभागाकडून व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

संबंधित लेख

लोकप्रिय