Wednesday, May 15, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची कला म्हणजे नर्मदा परिक्रमा - यशवंत कन्हेरे

PCMC : प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची कला म्हणजे नर्मदा परिक्रमा – यशवंत कन्हेरे

चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिक यशवंत कन्हेरे यांची नर्मदा परिक्रमा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर: वयाची साठी पूर्ण केलेले आणि सेवानिवृत्त महात्मा फुलेनगर, चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिक यशवंत कन्हेरे यांनी १०४ दिवसांत ३६०० किलोमीटरची नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली. PCMC News

गुरुवार २१ मार्च रोजी सकाळी महात्मा फुलेनगर, चिंचवडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यशवंत कन्हेरे यांनी संपूर्ण अंतर पायी कापले. गुरुवारी सकाळी त्यांचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन होताच सुवासिनीने औक्षण करून व पुष्पमाला अर्पण करून जोरदार स्वागत करण्यात आले. PCMC News

स्वागताला अनेक नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवानंद चौगुले यांनी परिक्रमा पूर्ण करणाऱ्या वीराचे अभिनंदन करताना ही बाब ऐतिहासिक शहरवासीयांच्या दृष्टीने गौरवास्पद असल्याचे सांगताना नर्मदा परिक्रमेचे महत्त्व सांगितले. अनेक सहकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगण्याची कला नर्मदा परिक्रमेचा प्रवास आपल्याला शिकवतो.आयुष्य बदलून टाकणारा हा अनुभव आहे. सुखाचा शोध, आसक्ती,मोह, माया, क्रोध यावर विजय मिळवण्याचा यातून मार्ग सापडतो. परिक्रमेच्या वेळी आपल्याला प्रत्येक दिवशी प्रेम, मानवतावादी आणि आपुलकीचे दर्शन झाले. म्हणूनच ही परिक्रमा यशस्वीपणे पार पडली.

  • यशवंत कन्हेरे
whatsapp link

हे ही वाचा :

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय