Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : किशोर थोरात यांना समर्थ सोशल फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेचा राज्यस्तरीय...

PCMC : किशोर थोरात यांना समर्थ सोशल फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : समर्थ सोशल फाऊंडेशन, कोल्हापूर आयोजित “राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत” हा पुरस्कार चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर अण्णासाहेब थोरात यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे. (PCMC)

सदर पुरस्कार सोहळा दिनांक २९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील सयाजी हॉटेल मध्ये प्रदान करण्यात येणार आहे. दर वर्षी हा पुरस्कार समर्थ सोशल फाऊंडेशन संस्थेबरोबर सामाजिक कार्य करून लाखो लोकांना व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त करण्यासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. (PCMC)

या वर्षी हा पुरस्कार पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर थोरात यांना जाहीर करण्यात आला. किशोर थोरात हे मागील दहा वर्षांपासून वेगवेगळ्या क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम करत असून त्यांनी मधुमेहमुक्ती व व्यसनमुक्ती साठी उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

किशोर थोरात हे विविध संस्था मार्फत आपले सामाजिक काम करत असतात जसे की
आधार शैक्षणिक संस्था, पुणे (गरीब आणि वंचित मुलांच्या शिक्षणाला मदत) : शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ (मानव अधिकार क्षेत्र,स्वामी समर्थ सेवा प्रचिती-(अध्यात्म) आणि समर्थ सोशल फौंडेशन, कोल्हापूर(मधुमेह मुक्त आणि नशामुक्त भारत अभियान) अशा अनेक क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर काम करून आपले योगदान समाजासाठी देत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले किशोर अण्णासाहेब थोरात यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी या अगोदरही विविध सामाजिक संस्थांकडून समाजरत्न २०२१, आदर्श समाजरत्न प्रेरणा २०२२, आयकॉन ऑफ आशिया २०२२, प्राईड ऑफ नेशन २०२२,आदर्श समाजभूषण प्रेरणा गौरव २०२२, स्टार इंडियन लीडर शिप अवॉर्ड २०२४, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२४, महाराष्ट्र आयकॉन २०२४ असे अनेक
पुरस्कार मिळालेले आहेत.

तर यापुढेही असेच विविध क्षेत्रात आपले उल्लेखनीय काम निश्चितच चालू ठेऊन देशाच्या हितासाठी एक खारीचा वाटा म्हणून काम करत राहणार असल्याचे आणि पुरस्कार हे प्रेरणा देतात व त्याचे फळ नक्कीच सेवेतून मिळत असल्याचे किशोर थोरात यांनी सांगितले.

समर्थ सोशल फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेचा हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल किशोर थोरात यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली व म्हणाले की पुरस्कार हा माझ्या बरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा सन्मान आहे.

हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल किशोर थोरात यांनी समर्थ सोशल फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेचे, संस्थेच्या पदाधिकारी वर्गाचे व त्यांना नेहमी या कार्यात साथ देणाऱ्या वरिष्ठ सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.

किशोर थोरात यांनी या क्षेत्रातील हा पहिलाच पुरस्कार असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती

School Job : त्रिमूर्ती हायस्कूल अंतर्गत भरती; पात्रता फक्त 12वी पास

संतापजनक : चौथीत शिकणाऱ्या तीन मुलींचा शिक्षकाकडून विनयभंग

धक्कादायक : एसी दुरुस्त करताना स्फोट; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय