पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : विविध प्रबोधनात्मक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते तसेच आमदार महेश लांडगे आणि अमित गोरखे यांच्या विशेष उपस्थितीत गुरूवारी सायंकाळी पार पडले. (PCMC)
या प्रसंगी विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्य भगवान शिंदे, मारुती भापकर, माजी नगरसदस्या कमल घोलप,अनुराधा गोरखे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, मयूर जाधव, नाना कसबे, संजय ससाणे,अरूण जोगदंड, सतिश भवाळ, संदीप जाधव, गणेश साठे, मयूर गायकवाड, भीमराव बरकडे, शिवाजी साळवे, डी.पी. खंडाळे, नाना कांबळे, आबा मांडरे, रामदास कांबळे, रामेश्वर बावणे, सविता आव्हाड आदी उपस्थित होते. (PCMC)
दूस-या दिवसाची सुरूवात आज सकाळी सनई वादनाने झाली. त्यानंतर शाहिरी गरजली अण्णांची हा कार्यक्रम पार पडला ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. हा कार्यक्रम संजय मगर, शाम चंदनशिव यांनी सादर केला. तदनंतर पांडुरंग गायकवाड यांनी स्वरगंधर्व प्रोडक्शन प्रस्तुत समाज प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला. दुपारच्या सत्रात अमीर शेख प्रस्तुत म्युझिक ऑफ बॉलीवूड हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर लेखणीचा बादशाह बापू पवार यांनी आपल्या शाहीरी आवाजात प्रेक्षकांची मने जिंकली.
हेही वाचा :
ब्रेकिंग : जुन्नर येथील इंगळून घाटात दरड कोसळली, या गावांचा संपर्क तुटला
मोठी बातमी : संसदेतील ‘त्या’ भाषणानंतर राहुल गांधींवर ईडीची छापेमारी होणार ?
Jio, Airtel चे टेन्शन वाढले ; TATA आणि BSNL मध्ये मोठा करार
ब्रेकिंग : माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन माहिती समोर
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !
मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले