Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आकुर्डी येथील भाजी मंडईच्या गाळेधारकांनी घेतली मतदान करण्याची शपथ

PCMC : आकुर्डी येथील भाजी मंडईच्या गाळेधारकांनी घेतली मतदान करण्याची शपथ

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा (maval loksabha 2024) मतदारसंघाच्या निवडणूकीत आम्ही लोकशाही प्रती जागरूक राहू तसेच जात, समुदाय, भाषा वा इतर कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजाऊ ” अशी शपथ आकुर्डी येथील श्री खंडेराया भाजी मंडईच्या १०५ गाळेधारकांनी घेतली, तसेच या निवडणूकीत १०० टक्के मतदान करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. PCMC NEWS

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाल व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) अतिरिक्त आयुक्त डाॅ. दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती करण्यात येत असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. PCMC NEWS

त्यानुसार आज पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक यांच्या उपस्थितीत आकुर्डी येथील भाजी मंडई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजी मंडईचे तानाजी जगताप तसेच चंद्रकांत काळभोर, पोपट काळभोर, सुनील कदम, लतीफभाई, गोपीनाथ जोगदंड, विजय पाटील, मनोहर पवार, माणिक सुरसे,भारत मांगडे, मारूती तरवडे, आशा खुळे, राणी डोईफोडे आदी गाळेधारक, नागरिक यांनी मतदान करण्याची शपथ घेतली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर

वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार

कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल

आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय