Shirur Loksabha : शिरुर लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी येत आहे. वंचित बहुजन आघाडीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरूरची उमेदवारी रद्द केली आहे. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने त्यांची उमेदवारी रद्द केल्याची माहिती आहे. Shirur Loksabha Constituency
वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना दिलेल्या उमेदवारीवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. वंचितने दिलेल्या या उमेदवारीवरून पक्षाला ट्रोल ही करण्यात येत होते. मात्र आता बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. वंचित कडून सांगण्यात आले आहे की, ‘बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.’
वंचित बहुजन आघाडीने मनसेचे नाराज नेते वसंत मोरे यांना पुणे मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे शिरूर लोकसभेसाठी मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली होती.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.


हे ही वाचा :
मोठी बातमी : कल्याण लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवार जाहीर
वेळ पडल्यास उमेदवारांना हॅलिकॉफ्टरने आणू, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान
मोठी बातमी : श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान
अभिनेत्री कंगना रणौत झाली होती बारावीत नापास, आज भाजपची लोकसभेची उमेदवार
कंगना राणौतने भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून घेतले ‘यांचे’ नाव, लोक करताहेत ट्रोल
आरटीई कायद्यातील बदलाच्या आदेशाची प्रत जाळून पालकांनी केला निषेध!