Wednesday, September 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : क्विकहिल फौंडेशन व प्रतिभा महाविद्यालय मध्ये सायबर जनजागृती करार

PCMC : क्विकहिल फौंडेशन व प्रतिभा महाविद्यालय मध्ये सायबर जनजागृती करार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहायांच्या प्रेरणेने क्विकहिल फौंडेशन तसेच प्रतिभा महाविद्यालय यांच्यामध्ये सायबर जनजागृती विषयक प्रकल्पाचा करार करण्यात आला. (pcmc)

सायबर सुरक्षा हे आजच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा हा प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक विषय बनला आहे.

या प्रकल्पाद्वारे नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे उपाय शिकवले जातील. या प्रकल्पाचा उद्देश नागरिकांना सायबर धोके ओळखण्याचे, त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, हे शिकविणे आहे.

याअंतर्गत विविध कार्यशाळा, सेमिनार आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयातील प्रथम तसेच द्वितीय वर्षाचे विद्यार्थी या प्रकल्पाद्वारे परिसरातील विविध शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन सायबर गुन्हे आणि उपाययोजना यांबद्दल माहिती देण्यासाठी स्वतंत्र सायबरक्लबची स्थापना करण्यात आली.

महाविद्यालयाच्या वतीने दिपू सिंह, बतूल परावाला, संकेत पवार तसेचऑलिव्ह विजू या विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली. त्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुणकुमार वाळूंज, मुख्यप्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आदींनी मार्गदर्शन केले. (pcmc)

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.हर्षिता वाच्छानी, प्रा.सुप्रिया गायकवाड आणि प्रा. उज्वला फलक काम पाहतील. नुकत्याच झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली.

वारीमध्ये सायबर जनजागृती क्विकहिल फौंडेशन तसेच प्रतिभा महाविद्यालय यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना सायबर सुरक्षेबद्दल अधिक जागरूक करण्यासाठी एक विशेष सायबर सुरक्षा जागरूकता प्रकल्प राबवण्यात येत आहे.

या प्रकल्पाचा उद्देश लोकांना सायबर गुन्ह्यांपासून स्वत:चे संरक्षण करण्याचे महत्व सांगणे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षात्मक उपाययोजनांची माहिती भाविकांना देण्यात आली.

प्रतिभा महाविद्यालय येथील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी अभिलाषा चितकोटे व संकेत पवार यांनी एन. एस. एस. तर्फे स्वयंसेवक म्हणून वारीमध्ये सहभाग घेतला होता. वारीमध्ये सहभागी असताना त्यांनी सहवारकर्याना सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती दिली.

तसेच त्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षात्मक उपाय योजनांबद्दलही जागरूक केले. दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातील डॉ.हर्षिता वाच्छानी, प्रा.सुप्रिया गायकवाड आणि प्रा. उज्वला फलक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

संबंधित लेख

लोकप्रिय