Wednesday, May 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ऑटिझम हा बौद्धिक अपंगत्वाचा मनोविकार आहे : डॉ. कैलास जोरुले

PCMC : ऑटिझम हा बौद्धिक अपंगत्वाचा मनोविकार आहे : डॉ. कैलास जोरुले

जागतिक ऑटिझम दिनानिमित्त परीसंवाद आणि संगणक प्रदान कार्यक्रम

अभिसार फाऊंडेशन, वुई टुगेदर फाऊंडेशनचा उपक्रम

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर:
“जागतिक  ऑटिझम” जागरूकता दिनानिमित्त (World Autism Awareness Day) वुई टूगेदर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने (दि.२ एप्रिल) अभिसार फाउंडेशनच्या “ऊर्जा” दिव्यांग मुलांची शाळा, वाकड (Pimpri chinchwad) येथील शाळेला चैताली देशपांडे (चिखली), अशोक निकुंभ, दत्ता चव्हाण (कोथरूड) यांनी दान  केलेले तीन संगणक शाळेच्या मुलांना प्रदान करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. कैलास जोरुले यांनी फित कापून संगणक कक्षाचे उद्घाटन केले.

यावेळी परिसंवाद व विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, दिव्यांग मुले आणि त्याचे पालक, शाळेचे शिक्षक व इतर मान्यवरांनी परिसंवादात सहभाग घेतला.

ऑटिझम ग्रस्त मुलांची शाळा एक दिलासा देणारा उपक्रम – डॉ.कैलास जोरुले

भारतात अपंगत्वाचे एकूण २१ प्रकार आहेत, त्यातील ऑटिझम किंवा स्वमग्नता हा एक सायको न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट डिसऑर्डर प्रकारचा मनोविकार आहे, या मुलांसाठी स्वतंत्र शाळा अभिसार फाऊंडेशन ने सुरू करून ऑटिझम ग्रस्त मुलांच्या पालकांना मोठा दिलासा दिला आहे, हा आजार मुलांना बौद्धिक अपंग बनवतो, त्याच्या मेंदूची सर्वसाधारण मुलासारखी वाढ झालेली नसते, त्यामुळे या मुलांना असामान्य परिस्थितीत पालकांना सांभाळताना खूप त्रास होतो, या आजारावर खात्रीशीर उपचार नाहीत, यावर संशोधन सुरू आहे. असे  डॉ. कैलास जोरुले, ऑर्थो सर्जन, आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांनी वाकड येथील चर्चा सत्रात सांगितले.

आम्ही शाळेमध्ये ऑटिझमग्रस्त मुलांना विकसित केले आहे – रमेश मुसूडगे

अभिसार फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही २०१९ मध्ये वाकड येथे अशा दिव्यांग मुलासाठी ऊर्जा” दिव्यांग मुलांची शाळा सुरू केली, या ठिकाणी शिक्षण, हस्तकला प्रशिक्षण, व्यायाम, खेळ, विविध थेरपीच्या द्वारे मुलांच्या मेंदूचा व मनाचा विकास करत असतो, त्यासाठी आमच्याकडे शिक्षक आहेत, एक स्वतंत्र अभ्यासक्रम (syllabus) आम्ही तयार केला आहे,त्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी क्रीडा, कलगुणात प्रावीण्य मिळवू शकले आहेत. समाजाने विशेषतः युवा पिढीने हे लक्षात घ्यावे की, वेगाने वाढणाऱ्या” ऑटिझम ” या प्रकारबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने ऑटिझम ग्रस्त (Autism) दिव्यांग  सर्वेक्षण करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. ऑटिझम असलेल्या मुलांचे सक्षमीकरण हे मोठे आव्हान आहे, या मुलांच्या भवितव्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. असे रमेश मुसूडगे (विशेष शिक्षक, समुपदेशक ) यांनी परीसंवादात सांगितले. PCMC NEWS

अभिसार फाउंडेशनच्या कार्याची प्रशासनास माहिती देऊ – मधुकर बच्चे

वूई टुगेदर फाऊंडेशनचे (WE TOGETHER FOUNDATION) सल्लागार मधुकर बच्चे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महापालिकेच्या आरोग्य, वैद्यकीय विभागाकडून या संस्थेतीतील मुलांना महिन्यातून किमान दोनदा  समुपदेशन मिळावे, तसेच अभिसार फाउंडेशनच्या कार्याची दखल मनपा (PCMC) प्रशासनाने घ्यावी, यासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करू. PCMC NEWS

दिव्यांग शाळेच्या संगणक विभागास मदत करू – सिता केंद्रे

बुध्दीचा विकास नसल्याने किंवा जन्मजात आजार असलेल्या मुलांना शिकवताना या शाळेच्या संचालकांना संगणक साहित्य किंवा खेळाचे कोणते विशिष्ट साहित्य गरजेचे असेल तेव्हा आम्ही ते देऊ, संगणक विभागास इतर सहाय्य करू, असे आश्वासन वुई टुगेदर फाउंडेशनच्या सल्लागार सिता केंद्रे यांनी दिले.


या वेळी वुई टूगेदर फाऊंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद, पदाधिकारी दिलिप चक्रे, अनिल शिंदे, उल्हास दाते, श्रीनिवास जोशी, रविंद्र काळे, जी एम चौधरी, राहुल ठाकूर, अरविंद पाटील, सुरेंद्र पाटील, जयंत कुलकर्णी, सरिता जयंत कुलकर्णी, माया सांगवे, अशोक निकुंभ, दत्ता चव्हाण, ऍड. विलास कडेकर, संस्थेचे सल्लागार मधुकर बच्चे, सिता केंद्रे तसेच अभिसार फाऊंडेशनचे (ABHISAR FAUNDATION ) सचिव रमेश मुसूडगे, किन्नरी शहा( HOD), केशव पारखी (व्यवस्थापक), स्मिता हांडे  पाटील, भाग्यश्री कापसे, वैशाली खेडेकर (शिक्षिका), विकास जगताप, ऋषिकेश मुसडगे (क्रीडाशिक्षक ) कुणाल, मोहित, योगेश दादा, गोपेश, कांबळे मावशी, मारणे मावशी, हरिदास शिंदे (संयुक्त अपंग हक्क समिती ) आदी मान्यवर उपस्थित होते. PCMC NEWS

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली खेडेकर यांनी केले, सूत्रसंचालन स्मिता हांडे  पाटील, भाग्यश्री कापसे यांनी केले, सलीम सय्यद यांनी आभार प्रदर्शन व समारोप केला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय