Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडSFI : शिक्षण हक्क कायद्यातील जनहित विरोधी बदल रद्द करा; एसएफआय ची...

SFI : शिक्षण हक्क कायद्यातील जनहित विरोधी बदल रद्द करा; एसएफआय ची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

पुणे : शिक्षण हक्क कायदा (RTE) मध्ये केलेले जनहित विरोधी व विद्यार्थी विरोधी बदल रद्द करा आणि आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करा, या मागणीला घेऊन आज स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) पुणे शहर कमिटी च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे शिक्षण सचिव यांना निवेदन पाठविण्यात आले. Pune

शिक्षण हक्क कायद्यात केलेल्या जनहितविरोधी बदल रद्द करण्यात यावा यासाठी SFI-DYFI च्या वतीने राज्यभरातील विविध जिल्ह्यातून शिक्षण सचिवांना अर्थात महाराष्ट्र शासनाला निवेदने पाठवण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाने या निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन आरटीई मध्ये केलेले जनहितविरोधी बदल रद्द केले गेले नाही, तर एसएफआय – डीवायएफआय च्या वतीने लवकरच या विरोधात पूर्ण राज्यभर जनआंदोलन उभे केले जाणार आहे, असेही एसएफआय पुणे शहर सचिव अभिषेक शिंदे यांनी म्हटले आहे.

निवेदन देताना एसएफआय पुणे शहर सचिव अभिषेक शिंदे, शहर सचिव मंडळ सदस्य ऋषिकेश शिंदे, शहर सचिव मंडळ सदस्य प्रणिता उदमले, शहर कमिटी सदस्य सृष्टी घुमरे, अनिकेत शिंदे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय