पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – चिंचवड येथील श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरण यांच्या वतीने आगरवाल बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला. (PCMC)
यावेळी चिंचवड येथील अग्रसेन भवनमध्ये आयोजित केलेल्या सुमारे दीड हजार अग्रवाल बांधवानी “अन्नकूट”चा आस्वाद घेतला.
यावेळी अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आर. आगरवाल, सचिव सुनील जे. आग्रवाल, अग्रसेन भवन अधिकारी विनोद मित्तल, सांस्कृतिक समिती प्रमुख गौरव आगरवाल, धर्मेंद्र अगरवाल,आरोग्य समिती सत्पाल मित्तल, जोगेंदर मित्तल, सीए के एल बन्सल, विनोद बन्सल, माजी अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, राजकुमार गुप्ता, पंच कमिटीचे वेदप्रकाश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाळीच्या काळात गोड मिष्टांन्न खाऊन आपल्याला कंटाळा येतो.तिन्ही वेळा गोड धोड खाणे आरोग्यासाठी योग्य नसते. (PCMC)
नमकीन आणि तिखट जेवणाची मेजवानी चे आयोजन केले जाते. यनिमित्ताने सर्वजण एकत्रित येऊन स्नेह मिलन साजरे करावे या हेतूने हे अन्नकूटचे आयोजन केले होते.
या अन्नकुटची परंपरा भगवान श्रीकृष्ण यांनी सुरु केली. ती परंपरा पुढे कायम ठेवतोय.अशी माहिती अध्यक्ष आगरवाल यांनी दिली.
यावेळी “खाना बचाओ -खाना खोलाओ”या संस्थेचे विनोद बन्सल आणि डॉ प्रियंका बन्सल यांनी उरलेले अन्न झोपडपट्टी आणि निगडी पुलाखालील बेघर नागरिकांमध्ये वितरित करण्यात आले . यामुळे सुमारे दीडशे दुर्बल घटकातील नागरिकांना अन्नाचा लाभ मिळाला.
हेही वाचा :
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर