Sunday, December 8, 2024
Homeराष्ट्रीयIndian railway : भारतीय रेल्वे कडे आहे जागतिक वारसा असलेले, १६८ वर्षांचे...

Indian railway : भारतीय रेल्वे कडे आहे जागतिक वारसा असलेले, १६८ वर्षांचे वाफेचे इंजिन (video)

चेन्नई – EIR-21 स्टीम इंजिन असे नाव असलेले हे वाफेचे इंजिन 1855 मध्ये इंग्लंडमधून भारतात आले. हा भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक वारसा आहे. EIR-21, जगातील सर्वात जुने कार्यरत लोकोमोटिव्ह, पेराम्बूर लोको वर्कशॉपमध्ये कार्यस्थित आहे. भारतीय रेल्वेचे कर्मचारी या इंजिनाचा रखरखाव (Maintenance) करतात. (Indian railway)

या 168 वर्षांच्या इंजिनाचे प्रदर्शन 2021 मध्ये स्वातंत्र्यदिनी करण्यात आले होते. त्यावर केलेले रंगकाम देखील अपूर्व आहे. या इंजिनाच्या पुढच्या भागावर तिरंगा साजरा करण्यात आला होता.

रेल्वेने म्हटले आहे की, १५ ऑगस्ट रोजी चेन्नईतील चेन्नई एगमोर आणि कोडंबक्कम रेल्वे स्थानकांदरम्यान EIR-21 स्टीम इंजिनाची वारसा विशेष सेवा जनतेसाठी ऐतिहासिक ठेवा म्हणून प्रदर्शित करण्यात आली होता. रेल्वे स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या उत्सवाच्या निमित्ताने १६७ वर्षे जुने जगातील सर्वात ताशी 40 किमी वेगाने चेन्नई एगमोर आणि कोडंबक्कम रेल्वे स्थानकांदरम्यान धावले. (Indian railway)

१९०९ मध्ये या इंजिनची सेवा बंद करण्यात आली. २०१० मध्ये पेराम्बूर लोको वर्क्सने या इंजिनाचा ताबा घेतला. यात यांत्रिक हाताची ब्रेकसिस्टीम आहे, तसेच दुहेरी वायू ब्रेकची सोय आहे. कोचवर डिझेल जनरेटर सेट ब्रेकिंग सिस्टीम, पाण्याच्या पंपासाठी आणि ट्रेनच्या प्रकाशासाठी लावण्यात आला आहे.

भारतीय जनतेला रेल्वेच्या इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी अशी वाफेची इंजिन्स राष्ट्रीय उत्सवाच्या वेळी प्रदर्शित केली जातात. भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठी नेटवर्क असलेली इंडस्ट्री आहे, आणि ब्रिटिश राजवट ते आधुनिक भारतासाठी उत्तम व्यवस्थापन आणि सेवा देणाऱ्या रेल्वेने जुनी इंजिन जपून ठेवली आहेत, हा आपल्या देशाचा ऐतिहासिक वारसा आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय