Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपड रे पाण्या-शेतकरी हतबल, खरीप हंगाम धोक्यात

पड रे पाण्या-शेतकरी हतबल, खरीप हंगाम धोक्यात

पुणे : या वर्षी पावसाने ओढ दिली आहे,उत्तर भारतात धुमाकूळ घालणारा पाऊस महाराष्ट्रात तुरळक पडला आहे. जुलै महिन्यात दोन आठवडे झाले तरी मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे विहिरींना पाणी आले नाही, ओढ्याला पूर आला नाही हे वास्तव आहे. पुणे कृषी विभागात शिरूर,मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे आठ उसाबरोबरच, तांदूळ, बाजरी, कडधान्य,भाजीपाला, पिके घेतली जातात. शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील उरळगाव, दहिवडी, पारोडी, रांजणगाव सांडस, शिवतक्रार म्हाळुंगी, आरणगाव, वडगाव रासाई, आलेगाव पागा, नागरगाव,मावळातील सोमटणे, टाकवे, कामशेत, खांडी, कुसवली, वडेश्वर आदी गावात यावर्षी जोरदार पाऊस न पडल्याने पिके धोक्यात आली आहेत, पुणे विभागात खरीप हंगामाचे पेरणीयोग्य क्षेत्र 10 लाख 65 हजार 48 हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यातील फक्‍त 26 हजार 860 हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. हे प्रमाण अवघे तीन टक्‍के आहे. यात पुणे जिल्ह्यात फक्‍त 6088 हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.


त्यामुळे शेतकरी, नागरिक चिंतेत आहे. खरीप हंगामात मोठया प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ वाल, उडीद, भुईमूग, बाजरी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. अजून खुरपणीच्या कामाने वेग घेतला नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले. जुलै महिन्यात दोन आठवडे झाले तरी मोठा पाऊस झाला नाही, त्यामुळे विहिरींना पाणी आले नाही, ओढ्याला पूर आला नाही, पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक चिंतेत आहे. खरीप हंगामात मोठया प्रमाणात सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. वाल, उडीद, भुईमूग, बाजरी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. अजून खुरपणीच्या कामाने वेग घेतला नाही असे शेतकऱ्यांनी सांगितले.

मावळ तालुक्यात दरवर्षी आषाढी एकादशीस पंढरपूरवरून आल्यावर भात लावणीस सुरुवात करतात. तसेच बांधाची कुदळणी करून तूर, पावटा यांची पेरणी करतात. भातरोपे लावणी योग्य होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. मात्र यावर्षी पाऊस अद्याप झाला नसल्यामुळे रोपे उगवली नाहीत. तालुक्यात आजही मुख्य पीक भाताचे आहे. वेळेत रोपे उगवली नसल्यामुळे दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. पावसाचे कोणतेही चिन्ह वातावरणात दिसत नाही. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी अतिशय चिंतेत आहेत. पुणे जिल्ह्यातील 1 हजार 380 गावे ही खरीप गावे आहेत.येथे पावसाने ओढ दिल्यास संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.

चिखली जाधववाडी येथे येथील धोकादायक उताराचा रस्ता सुरक्षित करा – रोहन चव्हाण

नितेश राणे यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा, तृतीयपंथीचे पुण्यात आंदोलन

जागतिक लोकसंख्यादिनी सुखी जोडप्यांचा सन्मान

संबंधित लेख

लोकप्रिय