Monday, May 20, 2024
Homeजुन्नरग्रामपंचायत घाटघर व जळवंडी येथे मनरेगा अंतर्गत गाव शिवार फेरीचं आयोजन 

ग्रामपंचायत घाटघर व जळवंडी येथे मनरेगा अंतर्गत गाव शिवार फेरीचं आयोजन 

जुन्नर : फांगळी ,घाटघर ,खंडकुबे ,उसरान या गावांमध्ये आज (दि.२६) रोजी सकाळी मनरेगा अंतर्गत येणारी कामे निवडण्यासाठी किसान सभा जुन्नर, पंचायत समिती मनरेगा विभाग, फॉरेस्ट विभाग, कृषी विभाग, घाटघर ग्रामपंचायत, जळवंडी ग्रामपंचायत याच्या माध्यमातून शिवार फेरीचे आयोजन करून गावातील ग्रामस्थ्यांकडून मनरेगा अंतर्गत येणाऱ्या गाव शिवरातील कामांची निवड करण्यात आली. Organization of Village Shivar Feri under MGNREGA at Gram Panchayat Ghatghar and Jhalwandi

यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आणि वैयक्तिक अशा दोनही प्रकारच्या कामांचा समावेश आहे. त्यामध्ये, वनतळी, पाणंद रस्ते, वृक्ष लागवड, वृक्षसंगोपन, विहिरीतील गाळ काढाणे, दगडी बांध, फळबागा लागवड, नाडेप, गांडूळ खत, शोष खड्डे अशा विविध प्रकारच्या कामांची निवड करण्यात आली आहे.

या शिवार फेरीत किसान सभेचे लक्ष्मण जोशी यांनी रोजगार हमी योजनेचा उद्देश सांगताना सांगितले की, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातच हक्काचा रोजगार मिळेल आणि आणि गावाचा विकास होण्यास मदत होईल. यामध्ये प्रत्येक मजुरांना प्रति दिनी २७३ रुपये असे २६ दिवस काम केल्याने ७०९८ रुपये गाव पातळीवर मिळू शकतात. मजुरांनी जास्तीत जास्त काम मागणी करावी व प्रशासनाने प्रशासनाने मागेल त्याला रोजगार मनरेगाच्या विविध विभागांतर्गत निर्माण करावा असे या शिवार फेरीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

घाटघर व फ़ांगळी गावात सरपंच मनोज नांगरे त्याबरोबर पंचायत समिती मनरेगा विभागाचे एपीओ दुर्गेश गायकवाड, रोजगार सेवक पिलाजी शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले. जळवंडी येथे सरपंच किरण शेळकंदे यांनी रोजगार हमी विषय आपले मत व्यक्त केले आणि आभार मानले.

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव गणपत घोडे, सरपंच मनोज नांगरे, सरपंच किरण शेळकंदे, ग्रामसेवक गाडेकर, ग्रामसेवक राम जोशी, फॉरेस्ट विभागाचे राजेंद्र गायकवाड, कृषी विभागाचे भोईर, रोजगार सेवक पिलाजी शिंगाडे, नारायण वायाळ, घाटघर ग्रामपंचायत सदस्या सुंदराबाई बुळे, अशोक बुळे, दिलीप मिलखे, काशिनाथ बुळे, माजी सरपंच बुधा बुळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय