Saturday, May 18, 2024
Homeआंबेगावश्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

श्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

आंबेगाव : श्री पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पोखरी येथे राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोळप होते, तर प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे, प्रा.धनंजय भांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

निबंध स्पर्धेत विशाल गोपाळ लांघी, ऋतुजा नारायण भालेराव यांनी प्रथम क्रमांक, तर कोमल संतोष कोळप हिने तृतीय क्रमांक, तसेच रवी दत्त तिटकारे याने तृतीय क्रमांक पटकावला.

तर वक्तृत्व स्पर्धेत मंगेश मस्के, सूरज फलके यांनी प्रथम क्रमांक, तर प्रियंका कोळप हिने द्वितीय क्रमांक तसेच विशाल लांघी याने तृतीय क्रमांक पटकावला.

तसेच रांगोळी स्पर्धेत कविता कोपळ, आश्विनी बेंढारी यांनी प्रथम क्रमांक, तर रवी तिटकारे द्वितीय क्रमांक तर साक्षी मोंहडूळे तृतीय क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी विलास रोंगटे यांनी केले, तर सुत्रसंचालन प्रा.महेश गाडेकर यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय