पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) ओबीसी विभागाच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, पिंपरी, येथे आनंदोत्सव साजरा करून सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणा बाबत दिलेल्या निर्णयानुसार ओबीसी चा राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये ओबीसींना न्याय दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार तसेच महाविकास आघाडीने आरक्षणाबाबत उचललेल्या ठोस पाऊले यामुळेच बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने स्वीकारून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेण्याचे निश्चित केलेले आहे.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महाविकास आघाडी मधील उद्ध ठाकरे, अजित पवार, छगन भुजबळ व बाळासाहेब थोरात सर्वांचे ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर आभार मानले. तसेच ओबीस सेल अध्यक्ष विजय लोखंडे यांनी शहराध्यक्ष व पदाधिकारी यांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला व ओबीसी सेल महीला अध्यक्ष सारिका पवार यांनी सुप्रिाम कोर्टच्या निर्णयाचे स्वागत तसेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले.
यावेळी महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, माजी नगरसेवक सतीश दरेकर, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, युवक इम्रान शेख, कविताताई खराडे, सचिन आवटे, पिके महाजन, काशिनाथ जगताप, दत्तात्रय जगताप, विकास साने, प्रकाश आल्हाट, उत्तम आल्हाट, आनंदा कुदळे, सतिश चोरमले, विशाल जाधव, विशाल आहेर, अलंकार हिंगे, तुकाराम बजबळकर, समिता गोरे, रासकर मॅडम, वाघोले मॅडम, तुषार ताम्हाणे इत्यादी मान्यवरांचा आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर