Friday, March 29, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम तातडीने द्या - चेतन बेंद्रे

दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम तातडीने द्या – चेतन बेंद्रे

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या वतीने दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम तातडीने द्या, अशी मागणी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी आयुक्त राजेश पाटील यांचे कडे केली आहे.

महापालिकेमार्फत शहरातील 80 टक्केहून जास्त मार्क्स मिळालेल्या दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाते. दहावी आणि बारावीचा निकाल लागून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. परंतु, महापालिकेने अद्याप दोन्ही परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना 2020 व 2021 चे रोख रक्कमेचे बक्षिस अद्यापही दिलेले नाही.

दरवर्षी ठरलेल्या कालमर्यादेच्या आत या विद्यार्थ्यांच्या हातात रोख रक्कम मिळाल्यास त्यांना शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी अडचण येणार नाही. शहरातील 50 टक्केहून जास्त लाभार्थीना अद्यापही अर्थसहाय्य मिळालेले नाही. विलंब करून विद्यार्थ्यांना बक्षिस देणे अन्यायाचेच ठरेल. या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय