Saturday, April 27, 2024
Homeराजकारणनुपूर शर्मांने टीव्हीवर देशाची माफी मागावी, सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका...

नुपूर शर्मांने टीव्हीवर देशाची माफी मागावी, सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा देशासह विदेशातही प्रचंड संताप व्यक्त केला गेला. या वक्त्तव्यामुळे देशात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. यामुळे अद्यापही तणावाचे वातावरण आहे. या वादग्रस्त वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला फटकारले. कोर्टाने म्हटले नुपूर शर्माने आपल्या वक्तव्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण केला आहे. कोर्टाने शर्माला टीव्हीवर येऊन देशाची माफी मागायला सांगितले.

आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, देशात जे काही घडत आहे त्याला नुपूर शर्मा एकटेच जबाबदार आहेत, तुम्ही स्वत: वकील असल्याचे सांगता. मात्र, तरीदेखील तुम्ही बेजबाबदारपणाचे वक्तव्य केले आहे. सत्तेची हवा डोक्यात शिरता कामा नये असेही खडे बोल सुनावत, तुमच्या वक्तव्याने देशातील वातावरण बिघडले आणि माफी मागण्यासाठी तुम्ही उशीर केला असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांनाही फटकारले.

कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारताना म्हटले की, नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांमध्ये पहिल्यांदा एफआयआर नोंदवण्यात आला. मग, त्याविरोधात तुम्ही कारवाई का केली नाही, असा सवाल कोर्टाने केला. एकच एफआयआर योग्य ठरवायचे असल्यास हायकोर्टात दाद मागा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. नुपूर शर्मा विरुद्ध नोंदवलेल्या सर्व एफआयआर दिल्लीला हस्तांतरित करण्यात याव्यात या मागणीची याचिका त्यांच्या वकिलाला मागे घ्यावी लागली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय