Wednesday, May 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडगोरगरीब भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप, अमोल भालेकर यांचा अभिनव उपक्रम

गोरगरीब भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप, अमोल भालेकर यांचा अभिनव उपक्रम

पिंपरी चिंचवड : रुपीनगर तळवडे मेन रोड येथील भाजी मंडईतील विक्रेत्यांना छत्री वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम शिवयोद्धा प्रतिष्ठान अध्यक्ष अमोल भालेकर यांनी राबवला. यावेळी शंभरहून जास्त विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अमोल भालेकर म्हणाले, “रुपीनगर मधील जनतेला १२ महिने भाजी, फळे आणि इतर साहित्य पुरवण्याची सेवा हे विक्रेते करतात. पहाटे ४ वाजता उठून मार्केटला जाऊन भाजी आणण्यापासून रात्री १०-१० वाजेपर्यंत हे विक्रेते रस्त्यावर आपल्या सेवेसाठी उपलब्ध असतात. भाजी हा नाशवंत माल असून ऊन व पावसाने लवकर खराब होण्याची शक्यता असते. ही गोष्ट लक्षात घेऊन आपणा सर्वांना एक छोटीशी मदत म्हणून आणि विक्रेत्यांचे आणि मालाचे ऊन आणि पावसापासून रक्षण व्हावे या हेतूने आम्ही हा कार्यक्रम हातात घेतला आहे. तसेच इतर काही अडचणी असल्यास मी कायम तुमच्या हाकेला धावून येईल, असे ते म्हणाले.

कार्यक्रमासाठी घारजाई माता फळ, भाजी संघटना आणि घारजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रम प्रसंगी रुपीनगर जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष कॅप्टन कदम साहेब, भाऊसाहेब काळोखे, भागवत भोई तसेच मोठ्या संख्येने रुपीनगर जेष्ठ नागरीक संघाचे सभासद उपस्थित होते. महिलांचा सुद्धा लक्षणीय सहभाग होता. सुत्रसंचालन दर्पण येवले यांनी केले. आशिष मोटे यांनी आभार मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी क्रांतिज्योत मित्र मंडळ तसेच शिवयोद्धा प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले.


संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय