Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपळे गुरव येथे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिग, कचऱ्याचे ढिग उचलण्याची नागरीकांचा मागणी

पिंपळे गुरव येथे रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिग, कचऱ्याचे ढिग उचलण्याची नागरीकांचा मागणी

पिंपरी चिंचवड : मनपाने कचराकुंडी मुक्त अभियान सुरू केले आहे. पिंपळे गुरव येथील वैदू वस्ती परिसरात वेळेवर घंटागाडी येत नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे रात्रीबेरात्री नागरिक कचरा कुंड्या नसल्याने साठलेला कचरा रस्त्यावर टाकला जात आहे.

शहरात केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक ठिकाणी विकास कामे चालू आहेत व काही ठिकाणी विकास कामे पूर्णत्वास आली आहेत. अशा वेळेस महानगरपालिकेच्या वतीने कचरा कुंडी मुक्त शहर करण्याचा संकल्प केला आहे, यासाठी महापालिकेने इंदौर शहराच्या धर्तीवर आपल्या शहरात कचरा कुंडीमुक्त होण्यासाठी शहराचा दौरा केला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गाजावाजा करून शहर कचराकुंडी मुक्त झाल्याचे जाहीर केले. दिवसातुन अवेळी केव्हाही गाडी येते परंतु नागरिकांना एकदा घंटागाडी येऊन गेल्यानंतर, वेळेत न टाकता आल्यामुळे तो कचरा कुठे टाकायचा हा प्रश्न निर्माण होतो आहे. कचराकुंड्या काढल्यामुळे नागरिक, आटीयन्स , व्यवसायिक, नोकरदार यांना घंटागाडीच्या वेळेत कचरा टाकता येत नाही. यामुळे रात्री व पहाटे बरेच व्यवसायिक व नागरिक मिळेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात, यामुळे या परिसरात कचऱ्याचे ढीग झाले असून दुर्गंधी पसरत आहे.

त्यामुळे येथील कचरा संकलनासाठी विशेष व्यवस्था करावी, कचरा संकलन करणाऱ्या गाड्या दिवसातून दोन वेळा याव्यात अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रुतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड तसेच महिला अध्यक्षा मीना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष संगीता जोगदंड, गजानन धाराशिवकर, मुरलीधर दळवी, अँड सचिन काळे, रामराव दराडे यांनी आरोग्य निरीक्षक पिंपळे गुरव यांच्याकडे केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय