Sunday, May 19, 2024
Homeजिल्हामुस्लिमांचा या देशात राहण्याचा हक्क आणि अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही...

मुस्लिमांचा या देशात राहण्याचा हक्क आणि अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही – उमेश चव्हाण

पुणे : इथली कायदा आणि न्यायव्यवस्था संघर्ष केल्याशिवाय आपल्या पदरी काही देत नाही. अत्याचार करणारे गुन्हेगार जेरबंद झाले पाहिजेत म्हणून गुन्हा दाखल करावा करण्यासाठी सर्वात आधी संघर्ष करावा लागतो. पुन्हा त्या गुन्हेगारांना अटक केली जावी यासाठी मोर्चा आणि आंदोलने करावी लागतात. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. इतकं सगळं केल्यानंतर जेव्हा शिक्षा लागते तेव्हा ती शिक्षा रद्द करून पुन्हा खुनी आणि बलात्काऱ्यांना जेव्हा मोकाट सोडले जाते, तेव्हा भीतीच्या छायेखाली इथल्या मुसलमानांना आयुष्य काढावे लागत आहे. भारतीय घटना प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करत असताना प्रत्येकाला भयमुक्त जगण्यासाठी संरक्षण देत असताना मात्र मुस्लिम समाजाला घाबरून भीतीच्या छायेखाली जगावे लागत आहे, अश्या घटना स्वतंत्र भारतातील दुर्दैवी घटना आहेत. मुस्लिमांनाही या देशांमध्ये इतर जातीय धर्मीय लोकांप्रमाणे राहण्याचा हक्क आणि अधिकार आहे असे मत रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.

बिलकिस बानोच्या आरोपीना पुन्हा तुरुंगात घातले पाहिजे. गुन्हेगारांची शिक्षा रद्द झालीच पाहिजे असेही उमेश चव्हाण म्हणाले.

बिलकिस बानोच्या प्रकरणात सरकारने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. हिंदू मुस्लिम भेदभाव करण्याची मानसिकता सरकारने बदलावी. मुस्लिमांना भय वाटणार नाही, याची काळजी हिंदुत्ववादी लोकांनी घ्यायला पाहिजे. हा देश सर्वांचा आहे. हिंदू इतकाच मुस्लिमांना या देशात राहण्याचा समान अधिकार आहे, असेही रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय