Tuesday, May 7, 2024
Homeजिल्हामहागाई विरुद्ध आम आदमी पार्टीचे जोरदार आंदोलन

महागाई विरुद्ध आम आदमी पार्टीचे जोरदार आंदोलन

नागपूर : भाजीपाल्यापासून अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी सारखा राक्षसी कर लावुन गरिबांचे जीवन असहाय्य करुन टाकल्याचे टिका करत आम आदमी पार्टी उत्तर नागपूरच्या वतीने कपिल नगर चौक येथे निदर्शने करण्यात आली.

उत्तर नागपुर आप चे अध्यक्ष रोशन डोंगरे, सचिव डॉ. अमेय नारनवरे, संगठनमंत्री प्रदीप पौंनिकर, कोषाध्यक्ष नरेश महाजन यांचा नेतृत्वाखाली उत्तर नागपुरातील सर्वसामान्य जनता आणि कार्यक़र्ते सहभागी झाले होते.हाय महँगाई हाय हाय महँगाई -ये कहाँ से आयी -मोदी ने लाई, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

मोदी सरकार नको त्या कार्यासाठी हज़ारो कोटी रुपये ख़र्च करते आणि तो पैसा ग़रीब कामगार अथवा हातावर जगणाऱ्या लोकांकडून कराच्या रूपाने वसुल कर आहे, अशी टिकाही यावेळी करण्यात आली. मोदी सरकारच्या गरीबांना शिक्षणापासून, नोकऱ्यांपासून वंचित ठेवाण्याच्या धोरणावरही या नारे निदर्शानाद्वारे कडाडून टीका करण्यात आली.

या आंदोलनात शंकर इंगोले, प्रदिप पौनिकर, डॉ.अमेय नारनवरे, नरेश महाजन, सुनील मैथु, विजय नंदनवार, अमित दुरानी, परीस भहोतकर, माणशिंग अहिरवार, अब्दुल सलाम, मोरेश्वर मौंदेकर, विशाल लांजेवार, विजय राठोड, पंजाब राठोड, निलम नारनवरे, लता मॅडमे, अंजु मरतवाडे, योगिता जनबंधु, सतीश सोमकुंवर, पंकज मेश्राम, विशाल वैद्य, स्वप्नील सोमकुंवर, शुभम मोरे, सचिन कांबळे, संकेत चरडे, गीता मेश्राम, उषा नागेश्वर, करुणा बांबोले, जयश्री बडगे, रंजना पाटील, नरेश देशमुख, नानक धनवाणी, शैलेश गजभिये, संजय चांदेकर, हिमांशू तांबे, मनोज वरघड, गोलू आंबडे, नंदू नागरारे, साम्ये रामटेके, बबलू गवळी, वरून ठाकूर, अरुण गुणारकर, रविकांत चौरसिया, तुषार गेडाम, अनिल संभे, क्लीमेंट डेव्हिड, रवींद्र गिधोंडे, अविनाश सोरते, पवन मोरे, रवींद्र गोखले, पप्पू दुधगवली, स्वाती तारवानी, सचिन चरोटे, नामदेव गेडाम, मॅहोन मेश्राम यांचा सहभाग होता.

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय