Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआगामी पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारीच्या 40 % तिकीट युवक पदाधिकाऱ्यांना द्यावे राष्ट्रवादी युवक...

आगामी पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारीच्या 40 % तिकीट युवक पदाधिकाऱ्यांना द्यावे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष इम्रान शेख यांची मागणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर जिल्हा नूतन शहर कार्यकारणी प्रथम मासिक सभा काळेवाडी येथील इंदू लॉन्स येथे पार पडली. या बैठकीमध्ये आगामी पालिका निवडणुकीमध्ये युवकांना संधी देण्यात यावी अशी मागणी युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख यांनी पक्षश्रेष्ठी यांना केली आहे.

युवक हा संघटनेचा कणा असतो सध्या शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व युवक कार्यरत झालेले आहेत. गेल्या काही वर्षापासून युवक संघटनेत काम करणारे युवक यांनी कामाच्या जोरावर शहरात चांगला मतदार वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे. आणि नवीन कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर सध्याचे युवक पदाधिकारी यांनी गेल्या चार महिन्यात केलेली कामे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यास ते निवडणुकीत नक्कीच विजय मिळवतील, त्यामुळे चाळीस टक्के तिकिटे युवक पदाधिकाऱ्यांना द्यावीत, अशी मागणी युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी शहराध्यक्ष गव्हाणे यांचेकडे केली आहे.

आजच्या घडीला 139 नगरसेवकापैकी 25 ते 30 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सभागृहात जातील व ‘अबकी बार सौ पार’ शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांचं स्वप्न पूर्णत्वास आणण्यात खारीचा वाटा उचलतील असे इम्रान शेख म्हणाले.

यावेळी महिला शहराध्यक्ष कवीताई आल्हाट, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, पंडित गवळी, मोहम्मद भाई पानसरे, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, फजल भाई शेख, श्याम लांडे, पंकज भालेकर, विनोद नढे, नगरसेवक मयूर कलाटे, सतीश दरेकर, अरुण बोऱ्हाडे, विजय लोखंडे, प्रकाश सोमवंशी, वर्षा जगताप, प्रसन्न डांगे, अमोल रावळकर, तुषार ताम्हाने, लवकुश यादव, सागर वाघमारे, दीपक गुप्ता, अनुज देशमुख, संकेत जगताप, अमोल बेंद्रे, ओम शिरसागर, प्रवीण खरात आदी प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय