Friday, May 10, 2024
Homeराज्यअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ३ जुलै रोजी देशव्यापी आंदोलन; या आहेत मागण्या.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ३ जुलै रोजी देशव्यापी आंदोलन; या आहेत मागण्या.

प्रतिनिधी : कामगार संघटनांनी ३ जुलै रोजी पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संघटना (सिटू) सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या राज्य महासचिव शुभा शमीम यांनी दिली आहे.

लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत शारिरीक अंतर राखून जिल्हा, तालुका व गाव पातळीवर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे ही शुभा शमीम यांंनी म्हटले आहे.

आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

◆ आयसीडीएस कायम करा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करा.

◆ आशा, शालेय पोषण आहार आदी योजना कर्मचाऱ्यांना कायम करून वेतनश्रेणी व सामाजिक सुरक्षा लागू करा. 

 शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे व त्यांना खरीप हंगामासाठी अर्थसहाय्य द्या.

◆ मनरेगाची कामे २०० दिवस ६०० रुपये रोजंदारीने सर्वांना उपलब्ध करा. 

◆ माणशी १० किलो धान्य मोफत द्या.

◆ आयकर लागू नसलेल्या सर्व कुटुंबांना पुढील ६ महिने मासिक १०००० रुपये अर्थसहाय्य द्या.

◆ विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा. 

◆ कामगारांना लाॅकडाऊनच्या काळातील वेतन द्या. घरकामगारांना परत कामावर घ्या.

◆ स्थलांतरित मजुरांना गावी जाण्याची मोफत सोय करा. जाऊ न इच्छिणाऱ्यांना निवास, अन्न व रोख रक्कम द्या. 

◆ लाॅकडाऊन काळातील वीज बिल व कर्जावरील व्याज माफ करा.

◆ पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द करा व महागाई कमी करा.

◆ केंद्र सरकारची कामगार कायद्यात कामगार विरोधी व मालक धार्जिणे बदल करण्याची पावले मागे घ्यावीत.

  


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय