Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यनाशिक : कोरोना योध्दा आशा व गटप्रवर्तकांवर हल्ले, शिवीगाळ, तक्रार करुनही कारवाई...

नाशिक : कोरोना योध्दा आशा व गटप्रवर्तकांवर हल्ले, शिवीगाळ, तक्रार करुनही कारवाई नाही

कोरोना सर्व्हेचे काम करत असतांना आशा व गट प्रवर्तकांवर हल्ले करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा – राजू देसले

नाशिक : कोरोना सर्व्हेचे काम करत असतांना आशा व गट प्रवर्तकांवर हल्ले करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक संघटना (आयटक) चे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच नेमलेल्या पथकातील सर्वाना उपस्थित राहण्याची मागणी केेेली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना रुग्ण संख्या वाढत असतांना गाव पातळीवर कोरोना प्रतिबंध करण्यासाठी गेली वर्षभर सर्व्हे मोहीम घराघरात जाऊन माहिती संकलन करणे ऑक्सिजन, ताप तपासणी आशा  व गट प्रवर्तक करत आहेत. आता ही मोहीम माझे कुटुंब माजी जबाबदारी अंतर्गत सुरु आहे. 

नाशिक जिल्यात येवला तालुक्यातील कातरणी येथील मंगला कदम  गावात आशा यांना तुम्ही आमच्या घरी येऊन तपासणी केली, आमची गावात बदनामी झाली म्हणून आशा कार्यकर्ती ला शिवीगाळ करण्यात आली आहे. संबंधित विषयी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र कारवाई झाली नाही. तसेच नांदगाव तालुक्यातील जामधदरी गावात आशा कर्मचारी मंगला विसपुते यांनाही गावातील गुंड कोरोना सर्व्हे चे काम करता म्हणून त्रास देत आहेत. त्या विरोधात ही तक्रात तालुका आरोग्य अधिकारी व पोलीस ठाण्यात केली आहे, मात्र कारवाई नाही. तसेच सटाणा तालुक्यातील  खांम लोण आशा अहिरे मंगला यांना 26 एप्रिल रोजी गावातील राजकीय गुंड खरी जाऊन अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली आहे. कारण गावात सर्व्हे सुरू असताना लक्षण आढळल्याने त्याच्या पत्नीची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यात त्या बाधित आढळल्याने त्यांना उपचार घेण्यासाठी सांगितले. याचा राग धरून गावात बदनामी झाली, गावात शेतावर कामासाठी माणसे मिळाली नाही  म्हणून घरी येऊन शिवीगाळ केली आहे व मारहाण केली आहे.

सर्व्हे चे काम जाहीर होतांना पथकाची घोषणा केली जाते. मात्र ते कर्मचारी उपस्थित बहुसंख्य ठिकाणी राहत नाही. त्यांना चांगला  पगार असल्यामुळे व प्रतिष्ठा असल्यामुळे येत नाहीत. व आशा व गट प्रवर्तक वरच जबाबदारी येत आहेत. वैद्यकीय अधिकारी  दुपार झाली की अहवाल मागतात. कामावरून कमी करण्याची धमकी देतात. आम्ही आपणास विनंती करतो की गाव कोरोना मुक्त करायचे असल्यास गावात कोरोना प्रतिबंधक समिती गावचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गाव पातळीवर कार्यरत सर्व कर्मचारी असावेत व महत्वाचा टप्पा  सर्व्हे कामाचा आहे . त्यावेळी संपूर्ण पथक उपस्थित राहिल्यास अश्या घटना रोखता येतील.  याचा विचार करावा. आशा व गट प्रवर्तक सर्व्ह सोबत लसीकरण कामात मदत करत आहे. यादी तयार करणे, लोकांना बोलवून आणणे हे काम करत आहेत. गावातील 70 लोक हे शेतात राहतात. 1 ते 2 किलो मीटर पायी चालत जावे लागत आहे. मात्र आशा व गट प्रवर्तक ना लसीकरण  चा मोबदला नाही  आहे. ग्रामपंचायत विभागाने आशा ना कोरोना कामाचा मोबदला दिला पाहिजे. आशा ना वेतन नाही तर फक्त कामा प्रमाणे  मोबदला मिळतो. नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत नि कोरोना कामाचा मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शहरी भागातील आशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करत आहेत. त्यांना महानगरपालिका नि कामाचा प्रोत्साहन भत्ता द्यावा. मुंबई, ठाणे, सांगली ,पुणे मनपा 300 रु रोज 200 रु रोज ने प्रोत्साहन भत्ता देत आहेत. मात्र नाशिक , मालेगाव , नंदुरबार देत नाहीत. याची दखल घ्यावी. आता केंद्र सरकार फक्त 1 हजार रुपये सर्व्हे चा भत्ता देत आहे. दिवसाला 33 रु. याची जाणीव ठेवून प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी निर्णय व्हावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

वेळोवेळी निवेदन कारवाई नाहीच 

आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांना घेऊन निवेदन दिली आहेत. मात्र दखल घेतली जात नाही. आशा व गट प्रवर्तक स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. काही आशाचा मृत्यू  झाला आहे. काहींचे कुटुंब कोरोना बाधित होत आहे. आशा कोरोना बाधित होत आहेत. आशा व गट प्रवर्तक सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे खाजगी दवाखान्यात उपचार घेऊ शकत नाही. तरी आशा, गट प्रवर्तक, व त्याचे कुटुंब कोरोना बाधित झाले तर शासकीय रुग्णालयात त्यांना उपचार मिळावा अशीही मागणी करण्यात आली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय