नवी दिल्ली : आज सकाळी ईशान्य भारताला भूकंपाचे धक्के बसले. सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी हे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र आसाम मधील सोनीतपूर या ठिकाणी होते.
नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार रिश्टर स्केल ६.४ तीव्रतेच्या भूकंपाचा उगम आसामच्या सोनीतपूर येथे झाला. आसाम, उत्तर बंगाल आणि ईशान्येकडील इतर भागात या भूकंपाचे धक्के जाणवले. तर गुवाहाटी मध्ये देखील भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.