Sunday, May 19, 2024
Homeजिल्हानागपूर : आशा व गटप्रवर्तकांनी कामगार दिनी साजरा केला 'मागणी दिन'

नागपूर : आशा व गटप्रवर्तकांनी कामगार दिनी साजरा केला ‘मागणी दिन’

नागपूर : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सिटू) तर्फे १ मे जागतिक कामगार दिनी आपले कामाचे जागी हातात मागण्याचे फलक घेऊन मुक निदर्शने करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साठे यानी दिली. 

कोरोना संकट आल्यापासून आशा वर्कर्स यांना वेठबिगार सारखे वागवले जात असून सुरक्षा साहित्य उपलब्ध नसून मोबदला सुद्धा द्यायला राज्य किंवा केंद्र तयार नाही. अशीच स्थिती राहिल्यास काम बंद आंदोलन करण्याची तयारी सुद्धा करावी लागू शकते, असेही साठे म्हणाले.

आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

१. आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचारी घोषित करा.

२. सर्व आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन लागू करा.

३. कोरोना काम करणाऱ्या सर्वांना ३०० रूपये रोज द्या.

४. सर्वांना सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्या.

५. सर्वांना १० लाख रु.आजीवन वीमा लागू करा.

६. सर्व आशा व गटप्रवर्तक यांना ५ हजार रुपये पेन्शन लागू करा.

७. सर्वांना रिटायरमेंट नंतर ५ लाख रुपये मोबदला द्या.

८. कामगार विरोधी चारही नवीन कामगार कायदे रद्द करा.

९. सरकारी संपत्ती अडाणी – अंबानी याना विकून खाजगीकरण बंद करा.   

“मागणी दिन’ च्या आंदोलनात राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, कांचन बोरकर, वंदना शेंडे, शालिनी सहारे, रंजना सहारे यांच्यासह ६०० आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्याची माहिती साठे यांनी दिली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय