रत्नागिरी : दापोली तालुक्यातील प्रसिद्ध अशा मुरूड बीचवर पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. समुद्र किनारा पर्यटकांनी गजबजलेला पाहायला मिळत आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व 3 ऑक्टोबर ला रविवार अशी सलग 2 दिवस सुट्टी असल्याने अनेक पर्यटक मुरूड बीचवर आनंद लुटत आहेत.
मुरूड बीच हा अत्यंत सुंदर व स्वच्छ बीच म्हणून ओळखला जातो. कोरोना कालावधीत गेली दीड वर्षे बीच बंद होते. आता शासनाने पर्यटन स्थळे खुली केल्यामुळे अनेक पर्यटक मुरूड बीचवर येऊन आनंद लुटत आहेत.
हाॅटेल व्यवसायिकांचे व्यवसाय सुध्दा बंद होते. त्यामुळे व्यवसायिकांवर आर्थिक संकट आले होते. आता पर्यटक वाढल्यामुळे हाॅटेल व्यवसायिक सुद्धा सुखावले आहेत. या बीचवर पर्यटकांना धोका नसतो. काही धोका उद्भवल्यास येथील स्थानिक ग्रामस्थ लगेच मदतीला धावून येतात. पर्यटकांना पाहिजे ती मदत करतात. असा हा मुरूड बीच पर्यटकांसाठी सुरक्षित बीच म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील नैसर्गिक सौदर्य स्वच्छ व सुंदर बीच बघून पर्यटक येथे येण्याचे पसंद करतात. सध्या मुरूड बीच पर्यटकांनी गजबलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.