Friday, March 29, 2024
Homeआरोग्यकोरोनाकरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकार देणार ५०,००० रुपयांची भरपाई, सर्वोच्च न्यायालयाची...

करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकार देणार ५०,००० रुपयांची भरपाई, सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

नवी दिल्ली, दि.४ : करोनामुळे देशात मृत्यू झालेल्यांच्या नुकसान भरपाईबाबत सोमवारी अंतिम निर्णय देण्यात आला. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या मागील सुनावणीत, करोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची भरपाई देण्याचे मान्य केले होते. केंद्राच्या या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. 

या संदर्भात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाला केंद्राने सांगितले की, करोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) भरपाईची रक्कम दिली जाईल.

सोमवारी सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती एम आर शाह यांनी सांगितले की, करोना मृतांच्या नातेवाईकांना ५०,००० रुपये दिले जातील आणि ते विविध कल्याणकारी योजनांअंतर्गत केंद्र आणि राज्याने दिलेल्या रकमेपेक्षा जास्त असतील. मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण करोना नाही म्हणून कोणतेही राज्य ५०,००० रुपयांची भरपाईची रक्कम नाकारू शकत नाही. मृत्यूचे कारण दुरुस्त करण्यासाठी जिल्हा अधिकारी उपाययोजना करतील. जिल्हास्तरीय समितीचे तपशील वृत्तपत्रांमधून प्रकाशित केले जातील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीतून असेल. भरपाईची रक्कम अर्जाच्या ३० दिवसांच्या आत वितरित करावी लागेल आणि मृत्यूचे कारण करोना म्हणून प्रमाणित केले जाईल. निकालाच्या तारखेनंतर होणाऱ्या मृत्यूंसाठी भरपाईची रक्कम दिली जात राहील, असे न्यायमूर्ती एम आर शाह यांनी असेही म्हटले आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय