Monday, May 6, 2024
Homeग्रामीणमहापालिकेने कायमस्वरूपी नोकरभराती करावी - माकप

महापालिकेने कायमस्वरूपी नोकरभराती करावी – माकप

पिंपरी चिंचवड : नव्या कायमस्वरूपी नोकरभरतीस मान्यता द्यावी, तसेच औद्योगिक नगरीच्या व्यवस्थापनासाठी मनुष्यबळाची नेमणूक करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महानगरपालिकेकडे कॉम्रेड गणेश दराडे यांनी केली आहे.

भारतातील सर्वात मोठ्या महापालिकेचा ३८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पिंपरी चिंचवाफ समितीचे सचिव गणेश दराडे म्हणाले की, कोव्हिड काळातील महापालिकेचे कार्य अतिशय गौरवास्पद आहे. वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक, आय टी, सेवाक्षेत्र, मध्यम लघुउद्योग यामध्ये संपूर्ण देशभरातून कामगार, कर्मचारी येथे कामाला आहेत. 

महानगरपालिकेत सध्या ७ हजार कर्मचारी आहे, त्याच्या खांद्यावर २६ लाख लोकसंख्येचा कारभार चावलणे शक्य नाही. तसेच येथे संघटित असंघटित कामगारांची सर्वात जास्त लोकसंख्या आहे.

मागील तीन दशकामध्ये अनेक गावाना समाविष्ट करून महापालिकेने वेगवान विकास केला आहे. येथील विशाल रस्ते, पाणी पुरवठा व्यवस्थापन, मनपा शाळा, आठही प्रभागामध्ये आरोग्य विभागाची ओपीडी सेंटर आणि दवाखाने आहेत. कितीही त्रुटी असल्या तरी त्या सुधारुन आयुक्त आणि मनपा कर्मचारी सर्वत्र सेवा देतात, कोरोनाच्या या महामारीमध्ये महापालिकेने लाखो लोकांना मृत्यूच्या दाढेतून वाचवले आहे. कोव्हिड केअर सेंटर मध्ये  हजारो नागरिकांना उपचार दिले आहेत, या कामाचे माकप’ने स्वागत केले आहे

महापालिकेतील दरवर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या शेकडो आहे. पूर्णवेळ सक्षम आणि कुशल कर्मचारी नेमले पाहिजेत, ३ हजाराहून जास्त कर्मचाऱ्यांची मनपाला गरज आहे. डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, आया, आरोग्य सेवक, क्लार्क, शिक्षक, सफाई कर्मचारी इ. खात्यामध्ये नवी आणि कायम स्वरूपाची नोकरभरती केल्यास मनपाची कार्यक्षमता वाढेल, नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्यामुळे राज्य सरकारने नव्या कायमस्वरूपी नोकरभरातीस मान्यता दयावी, महापालिकेने तेच पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे माकप’ने म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय